ग्लॅम-फूड : ‘घरातील साधे पदार्थच उत्तम’

कंगना दिवसाची सुरुवात वाटीभर लापशी, ताजी फळे किंवा कडधान्ये खाऊन करते. ती अत्यंत साधा आहार घेणे पसंत करते.
kangana ranaut
kangana ranautsakal

एकेकाळी सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आवडीने खाणारी कंगना आता पूर्ण शाकाहाराकडे वळली आहे. तिच्या मते, शाकाहारी जीवनशैली स्वीकारल्यापासून तिला एक वेगळीच शारीरिक, मानसिक शक्ती आणि आत्मिक समाधान मिळाले आहे.

कंगना दिवसाची सुरुवात वाटीभर लापशी, ताजी फळे किंवा कडधान्ये खाऊन करते. ती अत्यंत साधा आहार घेणे पसंत करते. दुपारच्या जेवणात ती मसूर दाल, चपाती, भाजी खाते. मधल्या वेळेत ती फळे किंवा थिक प्रोटिन शेक घेते. रात्रीच्या जेवणात गरमगरम सूप आणि ग्रील्ड व्हेजिटेबल्स खाते. व्हेजिटेबल पुलाव, सॅलड, सँडविचेस, पास्ता तिला फार आवडतो. तिला भारतीय आणि इटालियन खाद्यपदार्थांमध्ये विशेष रुची आहे. पदार्थ अधिक रुचकर व्हावा म्हणून ती त्यात जगभरातून आणलेल्या विविध मसाल्यांचा आणि हर्ब्जचा वापर करते. नवनवीन रेस्टॉरंट्सना भेट देऊन तेथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला तिला प्रचंड आवडते. घरातील साधे वरण, भात आणि भाजी हा सर्वांच्या आवडीचा स्वयंपाक तिच्यासाठी जणू स्वर्गसुखच आहे. कंगना घरी असताना दही-भात, खिचडी आणि ‘टर्मरिक शॉट’ घेणे पसंत करते. नॉर्थ इंडियन स्टाइल ‘पकोडा कढी विथ राइस’ ही तिची फेवरेट डिश आहे.

कंगनाही कॉफीप्रेमी आहे. फिल्टर कॉफी आणि काजू हे तिचे आवडते कॉम्बिनेशन आहे. परंतु ती सांगते, ‘‘कॉफीमुळे पित्तदोष वाढतो, म्हणून मी सध्या कॉफी घेण्याचे प्रमाण कमी केले आहे.’’ इटलीतील फ्लोरेन्समधील सगळेच कॅफे तिला आवडतात. लखनौमधील ‘शुक्ला चाट हाउस’ तिचे फेवरेट ठिकाण असून, तेथील आलू टिक्की, पाणीपुरी तिला खूप आवडते. तसेच, तिला काश्मीरमधील काश्मिरी पद्धतीने केलेले खाद्यपदार्थही भरपूर आवडतात.

कंगना स्वयंपाक तिच्या आईकडून शिकली. फावल्या वेळेत तिला भरपूर भाज्या आणि मसाले घालून केलेला पुलाव करायला आवडते. शरीराचा फिटनेस टिकवण्यासाठी ती डाएट फॉलो करते. बाहेरील जंक फूड खाणे ती आवर्जून टाळते. परंतु, बाहेरचे काही खावे वाटले, तर पिझ्झाच मागवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com