
Kargil vijay diwas : स्पेशल तिरंगी कुल्फी कशी तयारी करावी ?
Kargil Vijay Diwas : 1999 मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर (Pakistan) मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) साजरा केला जातो. युद्धादरम्यान, भारतीय लष्कराने (Indian Army) पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावले आणि "ऑपरेशन विजय" (Operation Vijay) चा भाग म्हणून टायगर हिल आणि इतर सर्व चौक्यांवर कब्जा करण्यात भारतीय सैनिकांना यश मिळवले होते.ही लढाई लडाखच्या (Ladakh) कारगिलमध्ये 60 दिवसांहून अधिक काळ भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध सुरु राहिले आणि शेवटी या लढाईत भारताने युद्ध जिंकले.
सैन्याच्या पराक्रमाची आणि पराक्रमाची गाथा आठवून तुम्हाला देशप्रेमात बुडवून घ्यायचे असेल, तर तुम्ही तिरंगा कुल्फी बनवून हा दिवस साजरा करू शकता.
हेही वाचा: Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवसाविषयीच्या या दहा गोष्टी तुम्हाला माहिती का ?
तिरंगा कुल्फी साहित्य :
1) एक लीटर दूध
2) एक पेला साखर
3) एक चमचा कॉर्नफ्लावर
4) अर्धा छोटा चमचा विलायची पावडर
5) एक छोटा चमचा केसर
6) आठ ते दहा पिस्ते भिजलेले
हेही वाचा: Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवसाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व काय आहे ?
कृती:
सर्वप्रथम दूध गॅसवर चांगले उकळून अर्धे करुन घ्यावे . नंतर घट्ट झालेल्या दूधात कॉर्नफ्लावर, साखर व विलायची टाकून परत थोडा वेळ ते दूध उकळू द्यावे. तयार झालेल्या मिश्रणाचे सारखे भाग तयार करुन घ्यावे. नंतर मग एका भागावर केसरी रंगासाठी केसर घालावे, तर एका भागावर हिरव्या रंगासाठी पिस्त्याचे तुकडे घालावे व उरलेला एक भाग तसाच पांढरा राहु द्यावा.
पुढे मग कुल्फीच्या साच्यात सर्वात खालच्या भागाला केसरयुक्त दूध, नंतर मग पांढरे दूध आणि नंतर पिस्ते मिसळलेले दूध टाकावे. नंतर ही कुल्फी सेट होण्यासाठी फ्रिजरमध्ये 12 तास ठेवावी.12 तासानंतर आपली तिरंगी कुल्फी तयार झालेली असले.
टीप - ही कुल्फी कुल्फीच्या साच्यातून हळुवार पणे बाहेर काढावी.
Web Title: Kargil Vijay Diwas How To Prepare Special Tirangi Kulfi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..