Kasuri Methi : हिवाळ्यात अशा प्रकारे तयार करा घरच्या घरी कसुरी मेथी; वर्षभर कामास पडेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasuri Methi

Kasuri Methi : हिवाळ्यात अशा प्रकारे तयार करा घरच्या घरी कसुरी मेथी; वर्षभर कामास पडेल

कसुरी मेथी हा असा एक इंग्रीडिएंट आहे जो, भाज्या आणि वरणाची चव वाढवण्यासाठी वापरला जातो. हे बऱ्याच सुक्या भाज्यांमध्ये सुद्धा टाकले जाते. काही लोक त्याचे पराठे, पोळी बनवतात तर काही जण जीरा राइस मध्ये सुद्धा टाकतात. पनीर आणि खव्यापासून बनवलेल्या ग्रेव्हीची चव त्याशिवाय अपूर्ण आहे. हे जेवणाची चव तर वाढवतेच, पण त्यात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मही असतात, त्यामुळे ते आरोग्यासाठीही चांगले असते. त्यात फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्वे ए, सी, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक सूक्ष्म पोषक घटक असतात. हे श्वसनाच्या समस्यांवर फायदेशीर आहे. तसेच गॅस्ट्रिक समस्यांपासून संरक्षण करते. 

हिवाळ्यात हिरवी आणि ताजी मेथी मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी सहज कसुरी बनवू शकता. तुम्ही मायक्रोवेव्ह किंवा उन्हात वाळवून कसुरी मेथी सहज बनवू शकता आणि जेवणाची चव वाढवू शकता.सुकी मेथी म्हणजेच कसुरी मेथीही जेवणाची चव वाढवते. कसुरी मेथी भाजीत घातल्यास जेवणाची चव दुप्पट होते. तुम्ही ग्रेव्हीसोबत कोणत्याही भाजीत कसुरी मेथी घालू शकता. तुम्हाला हवं असेल तर कसुरी मेथीपासून पराठे, पुर्‍या आणि मठरीही बनवू शकता. जर तुम्ही वर्षभर कसुरी मेथी वापरत असाल तर हिवाळ्यात येणाऱ्या हिरव्या आणि ताज्या मेथीपासून तुम्ही कसुरी मेथी तयार करू शकता. आत्तापर्यंत तुम्ही बाजारातून कसुरी मेथी खरेदी केली असेल, पण यावेळी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने कसुरी मेथी घरी बनवू शकता. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत घरच्या घरी कसुरी मेथी कशी तयार करायची याची सविस्तर माहिती..

हेही वाचा: Winter Recipe : पारंपरिक पद्धतीने ओल्या हळदीचे लोणचे कसे तयार करायचे?

घरी कसुरी मेथी बनवण्यासाठी सर्वप्रथम हिरव्या मेथीची पाने निवडा.आता देठापासून पाने वेगळी करा आणि चांगली मेथीची पाने निवडा. मेथी 2-3 वेळा पाण्यात चांगली धुवावी.आता मेथी चाळणीत किंवा जाड कापडावर कोरडी करा. पाणी सुकल्यानंतर तुम्ही ते मायक्रोवेव्हच्या ट्रेवर ठेवून पसरवा. आता मायक्रोवेव्हला सुमारे 3 मिनिटे हाय वर ठेवा. आता ट्रे बाहेर काढा आणि मेथी पलटून पुन्हा 3 मिनिटे मायक्रोवेव्ह करा.आता पुन्हा मेथी फिरवून पसरवा आणि मायक्रोवेव्हमध्ये दोन मिनिटे हाय वर ठेवा.आता मेथी बाहेर काढा आणि थोडी थंड होऊ द्या, नंतर हाताने कुस्करून घ्या आणि एअर टाईट डब्यात ठेवा.

हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टिक असणारी गूळ पापडी कशी तयार करायची?

आता बघू या मायक्रोवेव्हशिवायही कसुरी मेथी तयार करायची पद्धत..

यासाठी मेथी धुवून पाणी कोरडे करून पेपरवर चांगल्या प्रकारे पसरवून घ्या.आता ते पलटून पुन्हा पंखा चालवून वाळवून घ्या. मेथी सुकल्यावर थोडावेळ उन्हात ठेवा, याने मेथी क्रश झाल्यासारखी होईल. आता एका बॉक्समध्ये ठेवा. मेथीची भाजी किंवा पराठ्यात घालून त्याचा आस्वाद घ्या.