Winter Recipe : पारंपरिक पद्धतीने ओल्या हळदीचे लोणचे कसे तयार करायचे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

turmeric

Winter Recipe : पारंपरिक पद्धतीने ओल्या हळदीचे लोणचे कसे तयार करायचे?

Turmeric: आपण दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या काही मसाल्यापैकी एक महत्वाचा पदार्थ म्हणजे हळद .अशा या बहुगुणी हळदीचा उपयोग साधे खरचटणे, जखम,सर्दी खोकला पासून ते दुर्धर अशा कॅन्सर पर्यंत होतो. हळदीला आपल्या समाजात धार्मिक विधीमध्ये सुद्धा महत्वाचे स्थान आहे.

1) हिवाळ्यात ओली हळद आहारात वापरल्यास भूक वाढते,पोट साफ होतेहोते व प्रतिकारशक्ती चांगली होते.

2) अन्नाची चव वाढते व जुलाब थांबतात.

3) चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर ओली हळद बारीक करून लावता येते.

4) चेहऱ्याची त्वचा सैल पडली असेल तर ओली हळद व लोणी याचा लेप करून लावावा.

5) खोकला येत असेल तर ओल्या हळदीचा रस व मध चाटवावा .

6) ओली हळद आहारात नियमित वापरल्यास मधुमेह होण्यास प्रतिबंध निर्माण होतो.आजच्या लेखात आपण पारंपरिक पद्धतीने ओल्या हळदीचे लोणचे कसे तयार करायचे याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

हेही वाचा: Winter Recipe : दिल्ली स्टाईल 'सरसो का साग' कसा तयार करायचा?

साहित्य: 

● ओली हळद- एक वाटी (कापून) 

● आले- अर्धा वाटी (कापून) 

● हिरवी मिरची- अर्धा वाटी 

● लिंबू रस- अर्धा वाटी 

● मीठ- चवीपुरते

हेही वाचा: Winter Recipe : पारंपरिक पद्धतीने पौष्टिक दिवशे कसे तयार करतात?

कृती:

ओली हळद स्वच्छ धुऊन साल काढून त्याचे तुकडे करावे. त्याचप्रमाणे आलेसुद्धा स्वच्छ धुऊन साल काढून त्याचे तुकडे करून घ्यावे. हिरवी मिरची बारीक कापून घ्यावी.

बारीक केलेली हळद, आले व मिरची एकत्र करून मीठ, लिंबूरस टाकून मिसळावे. भाजलेली मोहरी व मेथीदाणे यांची जाडसर पावडर करावी. तेल तापवून थंड करावे.   

चवीप्रमाणे लोणचे मसाला मिळसून इतर सर्व मिश्रणात हे मिसळावे. काचेची बरणी थोडी तापवून हे मिश्रण नंतर त्यात भरावे.  झाकण घट्ट लावून साते ते आठ दिवस उन्हात ठेवावे.