ग्लॅम-फूड : मनसोक्त खा; पण व्यायाम करा

कतरिना कैफ कायमच चर्चेत असते ते तिच्या फिटनेसमुळे. तिच्या फिट असण्यात तिच्या आहाराचा मोठा वाटा आहे.
katrina kaif
katrina kaifsakal

- कतरिना कैफ

कतरिना कैफ कायमच चर्चेत असते ते तिच्या फिटनेसमुळे. तिच्या फिट असण्यात तिच्या आहाराचा मोठा वाटा आहे.

कतरिना तिच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास पाणी पिऊन करते. ती दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिते; तसेच उकडलेल्या भाज्या आणि फळे यांचा ती आहारात समावेश करते. सकाळी नाश्त्याला कतरिना फक्त कडधान्ये किंवा ओट्स खाणे पसंत करते. दुपारच्या जेवणात ब्राऊन ब्रेडसोबत पीनट बटर खायला तिला आवडते. संध्याकाळच्या वेळी सँडविच आणि रात्रीच्या जेवणात कतरिना सूप, साधी पोळी भाजी खाते. रात्री झोपण्याच्या दोन तास आधी ती जेवण करते.

सिनेमन रोल्स, खीर, बेबी पोटॅटोज, ग्रील्ड व्हेजिटेबल्स, डोसा हे तिचे आवडते पदार्थ. डाएट प्लॅन फॉलो करताना ‘चीट डे’च्या दिवशी ती पॅनकेक खायला प्राधान्य देते. लंडनमधील ‘ब्ल्यूबेरी हाउस’ हे तिचे सगळ्यात आवडते रेस्टॉरंट आहे. कतरिनाचे लहानपण लंडनमध्येच गेले, म्हणून भारतात आल्यावर तिकडच्या चवीचे पदार्थ इथे मिळतील की नाही याबाबत तिला शंका होती; पण आता मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाश्चात्य पद्धतीचे जेवण सहज उपलब्ध होत असल्याचे ती सांगते.

ब्लू बेरी, रासबेरी, अवोकॅडो या फळांसह बदामाचे दूध घालून केलेली ‘बेरी स्मूदी’ ही तिची फेवरेट. कतरिनाला स्ट्र्रीट फूड खायलाही आवडते. बंगाली मार्केटमध्ये मिळणाऱ्या चाटपासून दिल्लीच्या चांदणी चौकात मिळणाऱ्या पराठ्यांची ती फॅन आहे. पिझ्झा, पास्ता आणि त्यावर भरभरून किसलेल्या चीजशिवाय ती राहू शकत नाही. आपल्या बिझी शूटिंगच्या वेळापत्रकातही समतोल आहार सांभाळताना सोयाबीन बिया व अवोकॅडो यांचे सॅलड, शेंगदाण्याचे लाडू, भोपळा, शतावरी, कोहळा, हरभरा इत्यादी पदार्थांचा समावेश करून ती आहारात ‘व्हरायटी’ आणायला प्राधान्य देते. कतरिनाला खाण्यासोबतच स्वयंपाकाचीही आवड आहे. तिने तयार केलेल्या पदार्थांचे व्हिडिओ आणि फोटो ती इन्स्टाग्रामवर टाकत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com