Khandeshi Kalnyachi Bhakri: गोष्ट चवदार खान्देशी कळण्याची भाकरीची ?

ज्वारी ,काळे उडीद, गहू, हरभरा डाळ, तूर डाळ, मूग किंवा मुगाची डाळ, धने, जवस, जिरे, बडीशोप या पदार्थांपासून तयार केले जाते.
Khandeshi Kalnyachi Bhakri
Khandeshi Kalnyachi BhakriEsakal
Updated on

Kalnyachi Bhakri: कळण्याची भाकरी ही वेगवेगळ्या प्रकारचे धान्य व कडधान्य एकत्र करून बनवली जाते.सर्व कडधान्य दळून त्याची कळण्याची भाकरी बनवली जाते. पासून कडधान्यांपासून विटामिन मिनरल्स प्रोटीन यांसारखे पोषक तत्वे असतात.या भाकरीचे नियमित सेवन केल्यास शरीरात प्रथिनांची कमतरता भासत नाही.पचनक्रिया मजबूत होते.वजनही वाढत नाही अशा भाकरीच्या आहारात नेहमी असावी.खानदेशात ही भाकरी वांग्याच्या भरत्यासोबत खाल्ली जाते व अतिशय चविष्ट लागते ही भाकरी या पिठात मुख्यत्वे करून उडदाच्या समावेश असतो.ज्वारी ,काळे उडीद, गहू, हरभरा डाळ, तूर डाळ, मूग किंवा मुगाची डाळ, धने, जवस, जिरे, बडीशोप या पदार्थांपासून तयार केले जाते, हे सगळेच पदार्थ अतिशय पौष्टिक व शरीराला ऊर्जा देणारे आहेत, अख्खे कडधान्य नसेल तर डाळी ही चालतील.

पूर्वीपासूनच खान्देशातील पदार्थ वेगळ्या चवीचे राहिले आहेत. खान्देशी माणूस खाण्याच्या बाबतीत फार चोखंदळ मानला जातो.जसे तिखट,गोड,चटपटीत असे अनेक चवीचे पदार्थ खानदेशात प्रसिद्ध आहे.त्यातलाच एक प्रकार म्हणजे कळण्याची भाकरी आहे.खान्देशातील वांग्याचे भरीत, खानदेशातील वरण बट्टी,प्रसिद्ध आहे.पूर्वीपासून खानदेशात शेती व्यवसाय केला जातो. शेती व्यवसाय म्हणजे अंग मेहनतीचे काम असते.म्हणूनच शेतात जाणाऱ्या शेतकरी हा नुसताच पोट भरणे नाही तर त्याला पूर्ण पोषण मिळणे हेही महत्त्वाचे असते. म्हणूनच या विचारानेच जणू कळण्याच्या भाकरीचा शोध लागला असेल.

Khandeshi Kalnyachi Bhakri
Vegetable Daliya Recipe: नाश्त्यासाठी बनवा चवदार आणि चविष्ट व्हेजिटेबल दलिया..

सकाळी कळण्याची भाकरी चा नाष्टा तुम्हाला दिवसभर ऊर्जा देऊ शकतो.अनेक प्रकारचे धान्य व कडधान्य या कळण्याच्या भाकरीत असतात.त्याप्रमाणे प्रत्येक कडधान्य ची पोषक तत्वे ही या भाकरीत येतात व त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषक तत्वे तुम्हाला या भाकरीतून मिळतात. कळण्याची भाकर हा एक अतिशय रुचकर पदार्थ आहे. कळण्याची भाकरी बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे.

Khandeshi Kalnyachi Bhakri
Nag Panchami 2023 : यंदा नागपंचमी कधी आहे ? जाणून घेऊ या पूजेचे महत्व शुभमुहूर्त आणि पूजा विधी

साहित्य :-

● काळे उडीद चार वाट्या

● ज्वारी तीन वाट्या

● गहू दोन वाट्या

● हरभरे किंवा हरभऱ्याची डाळ एक वाटी

● मूग किंवा मुगाची डाळ एक वाटी

● पाव वाटी धने

● दोन चमचे बडीशोप

● दोन चमचे जिरे

● एक चमचा मेथी दाणे

● अर्धी वाटी जवस

Khandeshi Kalnyachi Bhakri
Nag Panchami 2023 : यंदाची नागपंचमी 'या' राशींच्या लोकांकरता ठरणार लाभदायक...

कृती:

खान्देशी कळण्याची भाकरी करत असतांना प्रथम सगळे धान्य व्यवस्थित स्वच्छ करून एकत्र करावे.गिरणीतून बारीक दळून आणावे.दळल्यानंतर चाळणीने चाळून घ्यावे. म्हणजे पिठातला कोंडा निघून जाईल. पोळी लाटताना किंवा भाकरी करताना व्यवस्थित करता येईल.चाळल्यानंतर संपुर्ण पिठात अंदाजाप्रमाणे मीठ घालून ठेवावे किंवा आयत्या वेळेस भाकरी करताना घातले तरी चालते.पीठ महिनाभर किंवा त्यापेक्षा जास्त टिकते.

हवाबंद डब्यात ठेवावे खराब होत नाही. ह्या पिठाची भाकरी करताना थोडेसे पीठ घेऊन पोळीच्या कणकेप्रमाणे भिजवून घ्यावे व छोटे छोटे गोळे घेऊन पोळपाटावर लाटून घ्यावी.छान लाटता येतात भाकरी प्रमाणे एका बाजूने पाणी लावून शिकावे.या भाकरीबरोबर लोणचे शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी.मिरच्यांचा ठेचा हे पदार्थ अतिशय चविष्ट लागतात. खानदेशात या भाकरी सोबत स्पेशल वांग्याचे भरीत हे लोकप्रिय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com