Kitchen Hacks : काय सांगताय? तेलात नाही तर पाण्यातही तळता येतात पुऱ्या, कसं ते एकदा बघाच

विना तेलाच्या पुऱ्या कशा बनवाल, इथे बघा रेसिपी
Kitchen Hacks
Kitchen Hacksesakal

Kitchen Hacks : गरमा गरम पुरी भाजी मिळाली तर स्वादाची गोष्टच काही वेगळी असते. मात्र पुरी म्हटलं की तेल येणारच. विना तेलाच्या पुऱ्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. पण आपल्या घरी वयोवृद्ध असतील त्यांना डॉक्टरांनी कमी तेलाचे पदार्थ खायला सांगितले असतील तर त्यांची इच्छा अशावेळी राहूनच जायची. पण चिंता करू नका यावरही उपाय आहे. विनातेलाच्याही पुऱ्या बनू शकतात. कसं ते बघा इथे.

तेलाचा वापर न करता पुऱ्या कशा तळायच्या याचे तसे तर बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. त्यातलाच एक व्हिडीओ फार व्हायरल झालाय. त्यात एका शेफनं तेलाविना पुऱ्या तळून दाखवल्या आहेत. आता या पुऱ्या बनवायच्या कशा ते आधी जाणून घेऊयात.

पुऱ्यांसाठी लागणारे साहित्य

गव्हाचं पीठ

मीठ

ओवा

दही

पाणी

Kitchen Hacks
Summer Food : कडक उन्हाळ्यातली हे पदार्थ शरीर ठेवतील Cool; उष्माघातापासून बचाव होईल अन् तब्बेतही सुधारेल!

पाण्यातल्या पुऱ्या कशा बनवायच्या

सर्वात आधी एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या आणि त्यात चवीनुसार मीठ, ओवा आणि चमचाभर दही घाला. यात तेल अजिबात टाकायचं नाही. तेलाऐवजी दह्याचा वापर केलाय जेणेकरून पुऱ्या नरम होतील. पीठ मळून छोटे छोटे गोळे लाटून घ्या आणि त्याच्या पुऱ्या बनवा.

Kitchen Hacks
Food Delivery App : हे ऑनलाउन फूड डिलीव्हरी अ‍ॅप Zomato अन् Swiggy पेक्षाही स्वस्त, वाचा सविस्तर

बनवण्याची पद्धत

आता गॅसवर एका कढईत पाणी गरम करा. पाणी उकळी येईपर्यंत गरम होऊ द्या. आता त्यात पुऱ्या तेलात तळतो तशा तळून घ्या. दोन्ही बाजूने नीट शेकून घ्या. पुऱ्या थोड्या प्रमाणावर फुलतात आणि काही वेळाने पाण्यावर तरंगू लागतात. त्यावेळी पुऱ्या बाहेर काढा. पुऱ्या तेलात तळल्यावर त्यांचा ज्याप्रमाणे रंग बदलतो त्याप्रमाणे याचाही रंग बदलणार नाही. त्यामुळे तुम्ही त्या तशाच खाऊ शकणार नाही. (Recipe)

त्यासाठी तुम्हाला एअर ड्रायर लागेल. पाण्यात तळलेल्या पुऱ्या एअर फ्रायरमध्ये टाका. आता पाहाल तर पुऱ्या तेलात तळतो तशा फुलल्या आहेत. त्यावर तेल बिलकुल दिसणार नाही. आता तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता. (Food)

डिस्क्लेमर - वरील रेसिपी जशाच तशी होईल याची हमी सकाळ समुह देत नाही. वरील लेख शेफने बनवलेल्या रेसिपीवर आधारित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com