Desi vs Hybrid Tomato: देशी टोमॅटो की हायब्रीड? कोणता Tomato आहे जास्त हेल्दी

सध्या बाजारात विविध प्रकारचे टोमॅटो पाहायला मिळतात. यात खास करून देशी टोमॅटो आणि हायब्रीड Hybrid असे दोन प्रकार पाहायला मिळतात
Desi vs Hybrid Tomato
Desi vs Hybrid TomatoEsakal

Desi vs Hybrid Tomato: टोमॅटो हा जेवणातील Meal अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. भाजी असो आमटी किंवा चटणी जेवणाची चव वाढवण्यासाठी टोमॅटो स्वयंपाकात Cooking अत्यंत गरजेचा घटक आहे. 

जेवणाचा स्वाद वाढवण्यासोबतच पदार्थांला योग्य घट्टपणा येण्यासाठीही टोमॅटोचा वापर केला जातो. तसचं टोमॅटोमध्ये विटामिन सी Vitamin C मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. Know about Hybrid and Desi Tomato Marathi Information about Vegetables

या आंबटपणामुळे चटणी आणि भाज्यांची चवव वाढते. तर टोमॅटोमधील Tomato दुसरं कंपाउंड लाइकोपीन ज्यात असलेल्या अँटीऑक्सिडंटमुळे हृदयाशी संबंधीत आजारांचा Heart Diseases धोका कमी होवू शकतो. यामुळेच जेवणात टोमॅटोचा वापर फायदेशीर ठरतो.

सध्या बाजारात विविध प्रकारचे टोमॅटो पाहायला मिळतात. यात खास करून देशी टोमॅटो आणि हायब्रीड Hybrid असे दोन प्रकार पाहायला मिळतात.

देशी टोमॅटोच्या पिकावर किडरोगाचा प्रादूर्भाव होण्याची जास्त शक्यता त्यामुळे उत्पादन कमी मिळतं आणि शेतकऱ्याचं Farmers नुकसान होवू शकतं. यासाठीच अनेक शेतकरी हायब्रीट टोमॅटोचं उत्पादन घेतात.

हायब्रीड टोमॅटो लवकर खराब होत नसल्याने अनेक शेतकरी या टोमॅटोचं उत्पादन घेतात. पण तुम्हाला माहित आहे का या दोन प्रकारच्या टोमॅटोपैकी कोणते टोमॅटो स्वयंपाकात वापरणं किंवा खाणं अधिक चांगलं आहे. यासाठी सुरुवातील आपण देशी आणि हायब्री़ड टोमॅटोमधील काही फरक जाणून घेणार आहोत. 

हे देखिल वाचा-

Desi vs Hybrid Tomato
Dry Tomato Benefits: ड्राय टमाटरचे 5 आरोग्यदायी फायदे, खा अन् फिट राहा

देशी टोमॅटोची चव

देशी टोमॅटो चवीला जास्त आंबट असतात आणि यात विटामिन सीचं प्रमाण जास्त असतं. हायब्रीटहून देशी टोमॅटो चवीला अधिक चांगले असतात. सला़डमध्ये कच्चा टोमॅटो खाल्ल्यास तुम्हाला या चवीतील फरक लक्षात येईल. 

देशी टोमॅटोची चव

देशी टोमॅटो हिरवे, लाल आणि पिवळ्या रंगाचे असतात. हे टोमॅटो पिकेपर्यंत त्याच्या वेगवेगळ्या रंग छटा दिसतात. या टोमॅटोंमध्ये विटामिन सी सोबतच मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. तसंच आकारानेही ते लहान असतात.

हायब्रिड टोमॅटो

हायब्रिड टोमॅटोचा रंग हा रुबी लाल असतो. आकारानेही ते काहीसे मोठे आणि साधारण एकाच आकारातील असतात. दिसायला ते अत्यंत आकर्षक दिसत असल्याने बाजारात कुणाहीची नजर या टोमॅटोकडे आधी जाते. कारण बऱ्याचदा देशी टोमॅटो लहान मोठी आणि पिचकलेले असू शकतात. 

हायब्रिट टोमॅटो मोठे आणि कडकही असतात. हे देशी टोमॅटोच्या तुलनेत जास्त टिकतात. काही दिवस घरात ठेवले तरी त्यांचा रंग बदलत नाही. 

देशी टोमॅटो रसाळ आणि लवकर सडतात

देशी टोमॅटो लवकर पिकतात आणि सडू लागतात त्यामुळे त्याची चव आणि वासही लवकर बिघडतो. नैसर्गिक रित्या उगवलेल्या भाज्या अनेकदा लवकर खराब होतात. त्यात कमी काळात बदल होतो. याउलट हायब्रिड पिकांसाठी केमिकलचा वापर जास्त केला जात असल्याने ते जास्त दिवस टिकतात. 

दिसण्यासाठी आकर्षक असले आणि जास्त टिकत असले तरी हायब्रिड टोमॅटोपेक्षा  कधीही देशी टोमॅटो खाणं हे जास्त फायदेशीर ठरतं. देशी टोमॅटोमध्ये पोषक तत्वदेखील अधिक प्रमाणात असतात.

डायबेटिज म्हणजेच मधुमेही रुग्णांसाठी देशी टोमॅटोचं सेवन उपुक्त ठरतं. तसचं टोमॅटोच्या सेवनामुळे लहान मुलांची दृष्टी अधिक चांगली होती. देशी टोमॅटो तुम्ही तुमच्या अंगणात, परसबागेत, गच्चीमध्ये किंवा अगदी गॅलरीत एखाज्या मोठ्या कुंडीमध्ये देखील लावू शकता. 

देशी टोमॅटोची स्वयंपाकाची चव अधिक वाढवत असल्याने अलिकडे या टोमॅटोंची मागणी वाढतं आहे. शिवाय त्यांचा दरही कमी असतो. त्यामुळे देशी टोमॅटो नक्कीच परवडणारे आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com