

Zero Oil Super Soft Recipe: Konkani Suranoli
esakal
Konkan Special Suranoli: सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्याला काय बनवावे, हा प्रश्न प्रत्येक घरात विचारला जातो. रोज रोज तेच तेच पोहे, उपमा किंवा डोसा खाऊन कंटाळा आला असेल, तर कोकणातील ही पारंपारिक 'सुरणोळी' एक उत्तम आणि चविष्ट पर्याय आहे. पीठ आंबवून बनवल्यामुळे ही सुरणोळी पचनासाठी अत्यंत हलकी असते आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. तसेच, यात वापरलेले ताजं खोबरं आणि गूळ शरीराला झटपट ऊर्जा देऊन दिवसभर ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात.
तांदूळ, ताजं खोबरं, दही आणि गुळाच्या मिश्रणापासून तयार होणारी ही सुरणोळी अत्यंत मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार होते. विशेष म्हणजे ही बनवण्यासाठी फारसे साहित्य लागत नाही.