

Why are there many side dishes in Korean food
esakal
Interesting facts about Korean side dishes: पारंपरिक कोरियन जेवण समोर आल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेते ते म्हणजे टेबलवर पसरलेल्या छोट्या-छोट्या वाट्यांचं दृश्य. मुख्य जेवण येण्यापूर्वीच टेबल रंगीबेरंगी भाज्या, किमची, मॅनेट केलेले बीन्स, सोया सॉसमधील बटाटे, ताजी कोशिंबीर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्यांनी भरून जाते.
अनेकांना हे स्टार्टर्स वाटू शकतात, पण कोरियन संस्कृतीत हा जेवणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या छोट्या साइड डिशेसना 'बंचन' (Banchan) असे म्हणतात. कोरियन जेवणात या डिशेस फक्त शोभेसाठी नसून त्यामागे मोठा इतिहास, संस्कृती आणि आरोग्याचा विचार दडलेला आहे.