आवडीने खा धपाटे, बनवा घरच्या घरी | Dhapate Recipe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhapata Recipe News

आवडीने खा धपाटे, बनवा घरच्या घरी

धपाटे विदर्भ व मराठवाड्यातील एक पारंपरिक पदार्थ आहे. जो घरोघरी आवडीने केला जातो आणि तितक्याच आवडीने खाल्ला सुद्धा जातो.

धपाटे करतांना जो धपधप आवाज येतो त्यावरुनच त्याच नाव धपाटे अस पडलं आहे.

चला तर मग बघू या धपाटे कसे करतात तर... (Lets Try Dhapate At Home, Know Recipe)

धपाटे करण्यासाठी लागणारे साहित्य :

1) दोन वाट्या ज्वारीचं पीठ,

2) एक वाटी गव्हाचं पीठ,

3) अर्धी वाटी बेसन

4) तिखट, हळद , हिंग-मीठ चवीनुसार

5) दोन चमचे जिरं,

6) बारीक चिरलेल्या भाज्या मेंथी,पालक

7) तिन बारीक चिरलेले कांदे

8) भाजण्यासाठी तेल

हेही वाचा: आंबे खाऊन कंटाळलाय? आता खा 'आंब्याची इडली'! जाणून घ्या रेसिपी

धपाटे करायची कृती :

1) एका मोठ्या परातीत ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ,आणि बेसन एकत्र करा.

2) त्यात तिखट, मीठ, हिंग, जिरं, हळद घाला. हे मिश्रण चांगलं एकजिव करुन घ्या.

3) आता त्यात कोथिंबीर आणि चिरलेला कांदा ,चिरलेल्या भाज्या टाकुन थोड पाणी घालुन पिठ भिजवून घ्या. भाकरीला पीठ भिजवतो तसं सैलसर भिजवा.

4) पोळपाटावर एक ओला कपडा टाकुन आपण जशा भाकरी थापतो तसं धपाटं थापून घ्या.

5) आणि हळुवार तव्यावर धपाटं टाका.आधी सुरुवातीला एका बाजूनं कोरडं भाजा. नंतर तेल लावुन दोन्ही बाजूंनी धपाटं खरपूस भाजून घ्या.

हेही वाचा: जिरे मसाला पेयाने उन्हाळा होईल सुसह्य; जाणून घ्या रेसिपी

धपाटे कशासोबत खायचे?

दही, ताजं लोणी, लोणचं किंवा तिळाची चटणी, जवसाची चटणी आवडत असेल तर का-हळाची चटणी आणि त्यावर तेल घेऊन तुम्ही खाऊ शकता.

जर घरचं ताक असल तर तुम्ही धपाटे ताकासोबतही खाऊ शकता.

(टिप - धपाटे लांबच्या प्रवासात खायला घेऊन जायला उत्तम आहेत)

Web Title: Lets Try Dhapate At Home Know Recipe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :food recipe
go to top