

Easy 5-Min Spicy Chutney
esakal
Fiery Dry Chilli Chutney Recipe: जर तुम्हाला जेवणात तिखट, झणझणीत आणि चमचमीत पदार्थ खायला आवडत असतील, तर महाराष्ट्रीयन पद्धतीची ही सुकी लाल मिरची आणि लसणाची चटणी तुमच्या स्वयंपाकघरात असायलाच हवी. अगदी मोजक्या साहित्यात आणि कमी वेळेत तयार होणारी ही चटणी चवीला अप्रतिम लागते. ही चटणी तुम्ही डब्यात साठवून ठेवू शकता. भाकरी, चपाती, वडापाव किंवा अगदी वरण-भातासोबत ही चटणी तोंडी लावायला उत्तम पर्याय आहे.