Ghavan Recipe: मुलांच्या डब्यासाठी 5 मिनिटात बनवा घावणे अन् चटणी

रोज पोहे, उपीट असा नाश्ता करुन कंटाळला असाल तर आजच ट्राय करा कोकणातील घावणे.
maharashtrian ghavan recipe with rice flour know all details
maharashtrian ghavan recipe with rice flour know all details
Updated on

नाश्त्यासाठी काय कराव? रोज रोज या मुलांच्या डब्याला काय द्यायचं? अने अनेक प्रश्न गृहिणींच्या मनात सकाळी सकाळी रेंगाळत असतात. रोज पोहे, उपीट असा नाश्ता करुन कंटाळला असाल तर आजच ट्राय करा कोकणातील घावणे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत घावणे अन् चटणी अतिशय आवडीने खातात. म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलो आहे घावण्याची रेसिपी.

घावणे हे खुप कमी कालावधीत होतात. इतकचं नव्हे तर याला फारसं साहित्यदेखील लागत नाही. घावणे हा पौष्टीक पदार्थ आहे. २ - ३ घावणे खाल्ल्याने पोट टम्म भरते.

साहित्य

तांदळाचं पीठ

मीठ

पाणी

maharashtrian ghavan recipe with rice flour know all details
Fried Rava Idli Recipe : नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी फ्राईड इडली, जाणून घ्या रेसिपी!

चटणीसाठी लागणार साहित्य

ओलं खोबर

लसणाच्या 2 किंवा 3 पाकळ्या

चणा डाळ

हिरवी मिरची (तिखटानुसार)

मीठ चवीनुसार

आणि फोडणीसाठी कढीपत्ता , तेल, मोहरी

maharashtrian ghavan recipe with rice flour know all details
Tamatar Chaat Recipe: नीता अंबानींनी खाल्लेली वाराणसीची प्रसिद्ध टोमॅटो चाट घरीच बनवा, लगेच ही सोपी रेसिपी नोट करा

कृती

प्रथम चटणी करुन घेऊ. ओलं खोबर, लसणाच्या 2 किंवा 3 पाकळ्या, चणा डाळ, हिरवी मिरची(तिखटानुसार), मीठ चवीनुसार मिक्सरमध्ये बारीक करुन घेऊ. त्यानंतर चटणीला फोडणी देण्यासाठी प्रथम तेल गॅसवर तापत ठेवा. त्यानंतर त्यामध्ये मोहरी कढी पत्ता अशी चटणीसाठी फोडणी तयार करा. मग झाली तुमची चटणी.

maharashtrian ghavan recipe with rice flour know all details
Peri Peri Masala Recipe: घरीच बनवा पेरी-पेरी मसाला अन् वाढवा फ्रेंच फ्राईज, स्प्रिंग रोलची चव

घावणे कसे बनवाल?

गॅसवर लोखंडी तवा लो प्लेमवर गरम करायला ठेवा. दुसरीकडे एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घ्या. त्यात १ वाटी पाणी घालून मिक्स करा. व त्यानंतर थोडं - थोडं करून आणखी एक वाटी पाणी घालून मिश्रण मिक्स करा. पीठ तयार करताना पीठाच्या गाठी तयार होणार नाही याची काळजी घ्या

मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून बॅटर तयार करा. पीठ तयार झाल्यानंतर गॅस हाय फ्लेमवर ठेवा, व तव्यावर ब्रशने किंवा अर्धा कांदा कापून त्याने तेल ग्रीस करा. आता एका छोट्या वाटीने बॅटर ढवळून तव्यावर घावण तयार करा.

त्यावर झाकण ठेऊन १० ते १५ सेकंद वाफ द्या. १५ सेकंद झाल्यानंतर झाकण काढून गॅस मध्यम आचेवर करून घावण पलटी करा, व दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे मऊ - लुसलुशीत जाळीदार घावणे खाण्यासाठी रेडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com