Makar Sankrant 2023: मकरसंक्रांत स्पेशल तीळ पापडी कशी तयार करायची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Special Teel Papadi

Makar Sankrant 2023: मकरसंक्रांत स्पेशल तीळ पापडी कशी तयार करायची?

Food: भारतीय खाद्यपदार्थांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या जेवणाची चव तर वाढवतातच पण आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्यांव्यतिरिक्त, अशा अनेक बिया आहेत ज्यांचा आपण नियमितपणे आपल्या आरोग्यासाठी आहारात समावेश करू शकतो. तीळ हे असेच एक बीज आहे, जे हजारो वर्षांपासून आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात वापरले जात आहे. आजच्या लेखात मकरसंक्रांत स्पेशल तीळ पापडी कशी तयार करायची याची रेसिपी पाहणार आहोत.

हेही वाचा: Makar Sankranti 2023: मकरसंक्रांत स्पेशल तीळ गुळाची पोळी कशी करायची?

साहित्य:

एक वाटी पांढरे तीळ

3/4 वाटी साखर

वेलची पूड

जायफळ पूड

हेही वाचा: Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला पतंग का उडवला जातो?

कृती:

सर्वप्रथम गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये तीळ टाकून मध्यम आचेवर ते खरपूस भाजून घ्यावे. सोनेरी रंग येईपर्यंत तीळ मस्त भाजून घ्यावे. भाजलेले तीळ एका भांड्यात काढून घ्यावे. त्यानंतर कॅरमल तयार करण्यासाठी कढईत 3/4 वाटी साखर टाकावी. ती साखर सतत हलवत राहावी. साखर चांगली सोनेरी रंग येईपर्यंत ढवळत राहावी. जास्त वेळ साखर गरम करायची नाही. यामध्येच वेलची पूड आणि थोडसं जायफळ टाकावे. त्यानंतर या मिश्रणामध्ये भाजलेले तीळ टाकून व्यवस्थित ते हालवा. आता वॅक्स पेपर घेऊन एका चमच्याच्या सहाय्याने तिळाच्या मिश्रणाचा गोळा वॅक्स पेपरवर ठेवावा. वॅक्स पेपरवर आधी तुम्ही तूप लावा त्यानंतर तिळाचा गोळा ठेवून लाटण्याच्या सहाय्याने पापडी लाटा. मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे तीळ पापडी लाटायचे आहे. अशाप्रकारे कुरकुरीत तीळ पापडी तयार होतील.