
Healthy Diwali Faral Tips
sakal
Choose Healthy Diwali Faral Options: दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि स्वादिष्ट फराळाचा काळ. पूर्वी मोठ्या कुटुंबात सगळे मिळून फराळ बनवायचे. आज मात्र छोटे कुटुंब, नोकरी करणारे जोडपे आणि शाळांच्या कमी सुट्ट्या यामुळे वेळेअभावी बाहेरून फराळ आणण्याचे प्रमाण वाढले आहे. पण बाहेरचा फराळ अनेकदा कमी प्रतीचे तेल, कृत्रिम रंग आणि साखर यांच्या अतिवापरामुळे आरोग्यास अपायकारक ठरू शकतो. त्यासाठी घरच्या घरी आरोग्यदायी फराळ करावा, असे आवाहन आहारतज्ज्ञांनी केले आहे.