esakal | घरीच तयार करा कणीक बर्फी; ही आहे पद्धत
sakal

बोलून बातमी शोधा

Make homemade dough barfi This is the method

गव्हाचे पीठ, तूप आणि गुळासह तयार करण्यात येणाऱ्या आटा बर्फीची चव गोड असते. साखर, मावा शिवाय ही बर्फी तयार केली जाते. चला तर जाणून घेऊया तयार करण्याची पद्धत...

घरीच तयार करा कणीक बर्फी; ही आहे पद्धत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : प्रत्येक ठिकाणातील खाद्यपदार्थाची एक वेगळी ओळख असते. जो त्यांच्यासाठी अनन्य आणि स्पेशल असते. विदर्भात सावजी, कोल्हापुरात तामळा रस्सा, गुजरातमध्ये ढोकळा अशी अनेक ठिकाणची वेगवेगळी ओळख आहे. या ओळखीमुळेच भारतीय खाद्यपदार्थ वेगवेगळ्या अभिरुचीचे अनुभव देतात.

ढोकळा, फाफडा, मुथिया, थेप्ला आणि बरेच काही अशा प्रसिद्ध स्नॅक्ससाठी गुजरात ओळखला जातो. हे सर्व खारट स्नॅक्स आहेत तर काही गोड स्नॅक्स गुजराती घरातही आढळतात. जे सायंकाळी स्नॅक्स म्हणून किंवा मिष्टान्न नंतर घेतले जातात. गुजराती सुखाडी ही एक प्रसिद्ध मिष्टान्न आहे. जे सर्व गुजराती लोक आवडीने खातात. याला गुड पापडी म्हणूनही ओळखली जाते. 

गव्हाचे पीठ, तूप आणि गुळासह तयार करण्यात येणाऱ्या आटा बर्फीची चव गोड असते. साखर, मावा शिवाय ही बर्फी तयार केली जाते. चला तर जाणून घेऊया तयार करण्याची पद्धत...

आटा बर्फीची रेसिपी

सर्वांत अगोदर एका कढईत तूप घाला. यानंतर गव्हाचे पीठ टाका. यानंतर सोनेरी होईपर्यंत गरम करा. जेव्हा हे मिश्रण चिकट होईल तेव्हा त्याला चांगले मिसळून घ्या. यानंतर थोडे दूध टाकून मिसळवा. जवळपास तीन ते चार मिनिटापर्यंत गरम करा. यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्या. नंतर वेलची पूड आणि गुळाचे तुकडे घाला आणि चांगले मिक्स करा. मिश्रण एका प्लेट किंवा ट्रेमध्ये घाला. ते समान रीतीने पसरवा आणि वरच्या पृष्ठभागावर दाबून ते गुळगुळीत आणि समान करा. यानंतर त्याला बदाम आणि पिस्ता सारख्या कोरड्या फळांनी सजवा. हे सेट करू द्या. त्याचे तुकडे करा आणि तुमची बर्फी तयार आहे.