
Homemade Healthy Amla Candy For Immunity And Digestion: हिवाळा सुरु झाला की आपल्या घरात वेगवेगळे पौष्टिक आणि चवीचे पदार्थ बनायला सुरुवात होते. डिंकाचे लाडू, ड्रायफ्रुटसचे लाडू, उडदाचे लाडू, आवळा सुपारी, सुंठवडा, खजुराचे लाडू आणि सगळ्यांच्या आवडीची म्हणजे आवळा कँडी.
आवळा कँडी तिच्या आंबट-गोड चवीमुळे सगळ्यांच्या आवडीची आहे. आवळा व्हिटॅमिन सीचे उत्तम स्रोत आहे. तसेच आवळा कँडीमध्ये असलेल्या इतर पदार्थांमुळे आवळा कँडी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठीही उपयुक्त आहे. चला तर मग आज घरच्या घरी सोप्या पद्धतीने आवळा कँडी कशी बनवायची ते जाणून घेऊया...