
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. सध्या संचारबंदीमुळे हे सर्व करता येणे शक्य नाही. अतिप्रमाणात खाणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना वजन वाढण्याची चिंता सतावू लागली आहे.
लॉकडाऊनमुळे सध्या सर्वचजण घरी आहेत. इतर वेळी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. त्यासाठी मॉर्निंग वॉक, जिममध्ये विविध प्रकारचे व्यायाम, ट्रेकींग, पोहणे, सायकलिंग इत्यादींवर भर दिला जातो. सध्या संचारबंदीमुळे हे सर्व करता येणे शक्य नाही. तसेच दिवसेंदिवस घरात असल्यामुळे नव-नव्या रेसिपी ट्राय केल्या जात आहेत. त्यामध्ये विशेष करून चटपटीत, तेलकट पदार्थ घरोघरी बनवले जाऊ लागले आहेत. अतिप्रमाणात खाणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना वजन वाढण्याची चिंता सतावू लागली आहे.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आहाराबाबत ही घ्या काळजी...
- आहारात तेलाचे प्रमाण कमी करा. मैद्याचा वापर टाळून ज्वारी, नाचणी, बाजरी आणि गव्हाच्या पिठाचा वापर करा.
- प्रथिनांचे आहारात प्रमाण वाढवा. अंडी, चिकन, मटण अशा स्निग्ध पदार्थांचा आहारात प्रमाणात समावेश करा.
- साखरेपेक्षा गुळाचा वापर करा. त्यामुळे लोह वाढीस मदत होईल.
- तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ शक्यतो टाळा. घरच्या घरी कुकीज तयार करा.
- पौष्टिक स्नॅक घ्या. सायंकाळी भडंग, राजगिरा लाडू असे स्नॅक घ्या.
- सध्या घरच्या घरी पिझ्झा, बर्गर असे पदार्थ तयार होत आहेत. या पदार्थांमुळे वजन वाढू शकते, त्यामुळे हे पदार्थ टाळा.
- एकाचवेळी भरपेट खाण्यापेक्षा दर दोन तासांनी थोडे थोडे खा.
- उन्हाळ्याचे दिवस असल्याने भरपूर पाणी प्या. लिंबू सरबत, कोकम सरबत, नारळ पाणी घेणे फायदेशीर.
- आंबा, कलिंगड, द्राक्षे अशी सिझनल फळे दिवसांत एकदा तरी खा. फळांचा ज्यूस करून पिण्यापेक्षा ती तशीच खा.
- जेवणात दही, ताक यांचा समावेश करा. डाळींचे प्रमाण वाढवा.
- सॅलडमध्ये कोशिबींर घ्या. काकडी, टोमॅट, गाजराचा समावेश करा.
आणखी वाचा - कोरोनावाढीचा सर्वाधिक वेग, पुण्यात!
हे व्यायाम करा...
- मोठा टेरेस असेल तर तेथे फिरण्याचा व्यायाम करा.
- घरच्या घरी जमतील असेच व्यायाम करा.
- योगासने, प्राणायाम जरूर करा.
तेलकट, चमचमीत पदार्थ, फास्ट फूड घेणे टाळावे. जेवणात तेलाचा कमी वापर करा. घरच्या घरी जमतील इतके व्यायाम करा. योगासने, प्राणायाम करा. संतुलित आहारावर भर द्या.
- मनाली चौगुले, आहारतज्ज्ञ