Okra Info हिरवी भेंडी VS लाल भेंडी, कोणती भेंडी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर

Green vs Red Lady Finger: अलिकडे बाजारात लाल रंगाची भेंडी Red Okra देखील उपलब्ध झाली आहे. अनेकांनी ही भेंडी नेमकी लाल कशी किंवा ती कशी लागत असावी, तिचे नेमकी फायदे काय याबद्दल कल्पना नसेल
Green vs Red Lady Finger
Green vs Red Lady FingerEsakal

Green vs Red Lady Finger: आहारामध्ये सर्व भाज्यांचा Vegetables समावेश करणं गरजेचं आहे. खास करून वेगवेगळ्या रंगाच्या भाज्यांचा आहारामध्ये समावेश केल्यास शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचा पुरवठा होतो. प्रत्येक भाजीचे शरीराला फायदेच आहेत. Marathi Health Tips Know about Red and Green Okra Benefits

यापैकीच एक साधारण प्रत्येक घरामध्ये शिजणारी भेंडीची भाजी Okra. भेंडीची भाजी किंवा कुरकुरीत भेडी फ्राय अनेकांच्या पसंतीची असते. तुम्ही आजावर बाजारातून हिरव्या रंगाची भेडी आणून तिच्या वेगवेळ्या प्रकारच्या रेसिपीज Recipe केल्या असतील.

मात्र अलिकडे बाजारात लाल रंगाची भेंडी Red Okra देखील उपलब्ध झाली आहे. अनेकांनी ही भेंडी नेमकी लाल कशी किंवा ती कशी लागत असावी, तिचे नेमकी फायदे काय याबद्दल कल्पना नसेल.

लाल भेंडीचं उत्पादन कमी होत असल्यामुळे ती हिरव्या भेंडीच्या तुलनेत महागही असते. त्यामुळे अनेकजण लाल भेंडी घेण्याकडे दुर्लक्ष करतात.

कोणती भेंडी जास्त आरोग्यदायी

लाल भेंडी आणि हिरवी भेंडी यात काय फरक किंवा आरोग्यासाठी दोन्हीपैकी कोणती भेंडी जास्त फायदेशीर आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. लाल भेंडीला काशी लालीमा भेंडी असंही म्हटलं जातं.

कारण वारणसी इथल्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल्स इथं या भेंडीचं वाण तयार करण्यात आलं आहे. ज्या संशोधकांनी हे वाण शोधून काढलं त्यांच्या मते लाल भेंडी ही हिरव्या भेंडीच्या तुलनेत अधिक आरोग्यदायी आहे.

हिरव्या भेंडीचा रंग हा क्लोरोफिल Chlorophyll मुळे हिरवा असतो. तर लाल भेंडीचा रंग हा एंथोसायनिन Anthocyanin नावाच्या पिगमेंटमुळे लाल असतो. तज्ञांच्या मते हिरव्या भेंडीच्या तुलनेत लाल भेंडीच्या सेवनाने शरीरात ३० टक्क्यांपर्यंत हिमोग्लोबिन आणि आयर्न वाढतं. तसंच हिरव्या भेंडीच्या तुलनेत लाल भेंडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

हे देखिल वाचा-

Green vs Red Lady Finger
फिटनेस जपायचाय, भेंडीचे पाणी प्या!

लाल भेंडीचे फायदे

लाल भेंडीमध्ये लोह, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, आहारातील फायबर यासारखी पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात आढळतात.

१. अॅनिमियाचा धोका होईल कमी- लाल भेंडीच्या सेवनामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. यासाठी अॅनिमियाच्या रुग्णांसाठी भेंडीचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. लाल भेंडीमध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास आहारात लाल भेंडीचा समावेश करावा.

२. शुगर नियंत्रणात राहण्यास मदत- रक्तातील सारखेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी लाल भेंडीचं सेवन फायदेशीर ठरतं. लाल भेंडीमध्ये असलेल्या फायबरमुळे तसचं इतर गुणधर्मांमुळे शरीरातील शुगर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी लाल भेंडीचं सेवन फायदेशीर ठरू शकतं.

Green vs Red Lady Finger
Chicken Masala Fry Recipe : चिकन फ्राय करणं एकदम सोप्पय, रेसिपी पहाच!

३. कोलेस्ट्रॉलची समस्या सुटेल- हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका देखील बळावू शकतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखणं गरजेचं असतं. शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅट कमी कऱण्यासाठी लाल भेंडीचं सेवन उपयुक्त ठरतं. यातील पॅक्टिन नावाचं तत्व शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.

४. रक्तदाब नियंत्रणात राखण्यास मदत- लाल भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात सोडियम आढळतं. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

५. गरोदर महिलांनी करावं सेवन- गरोदर महिलांनी लाल भेंडीचं सेवन केल्यास पोटातील गर्भाचा योग्य विकास होण्यास मदत होते. लाल भेंडीमध्ये उपलब्ध असलेल्या फॉलेटमुळे पोटातील बाळीची योग्य वाढ होण्यास आणि बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी मदत होते.

लाल भेंडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याने आता केव्हातरी हिरव्या भेंडी ऐवजी लाल भेंडी नक्की ट्राय करून पहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com