गोड टरबूज कसे निवडायचे..जाणून घ्‍या 

watermelon
watermelon

जळगाव : उन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमान देखील वाढण्यास सुरवात झाली आहे. उन्हाळ्याचा हंगाम जवळ येताच बाजारात रसाळ फळे येऊ लागली आहेत. परंतु, उन्हाळ्यात गारवा देणारे टरबूज देखील विक्रीला आहे. वर्षभर संपूर्ण बारा महिने टरबूज खायला मिळेल; पण फक्त उन्हाळ्याच्या काळातच चांगले आणि गोड टरबूज मिळेल. बाजारात अनेक प्रकारचे टरबूज आहेत, परंतु, गोड आणि लाल रंगाचे टरबूज कसे निवडायचे याबद्दल माहिती असणे आवश्‍यक आहे. बऱ्याच वेळा टरबूज खरेदी करताना, लोक फक्त टरबूज दिसण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि विचार न करता टरबूज आणतात. पण टरबूज आतून कच्चा आणि चव नसलेला निघतो. चांगले आणि योग्य टरबूज खरेदी करायचे असल्यास काही गोष्टी लक्षात घेऊन टरबूज खरेदी करा. 

टरबूजचा रंग पहावा
टरबूज खरेदी करताना त्याचा रंग तपासा. जर टरबूज गडद हिरवा असेल, तर तो मुळीच विकत घेऊ नका. कारण एकतर तो आतून कच्चा असेल किंवा तो कोल्ड स्टार असेल. जर चांगले पिकलेले आणि गोड टरबूज हवे असेल तर नेहमीच एक हलका हिरवा पट्टी असलेला टरबूज खरेदी करावा. तसेच टरबूजवर पिवळ्या किंवा क्रीम रंगाचे डाग असतील तर त्या टरबूजाची गोडही निघते.

हलके ठोकून तपासा 
बऱ्याचदा पाहिले असेल की खरबूज खरेदी करताना लोक त्याकडे पाहतात. टरबूज पक्‍के आणि गोड असेल तर ते ठोकून पाहिल्‍यास त्‍याचा मोठा आवाज येईल. त्याच वेळी टरबूज कच्चे असेल तर त्‍याचा आवाज कमी येईल. म्हणून जेव्हा आपण टरबूज खरेदी करता, त्याचा रंग पाहिल्यानंतर, ठोकून पाहण्याचे विसरू नका.

टरबूजवरील पट्टे
उन्हाळ्याच्या हंगामात आपल्याला देशी टरबूज खायला मिळेल. या हंगामात ताजेतवाने येत असलेल्या टरबूजमध्ये तिचे स्टेम देखील पाहू शकता. जर हिरव्या रंगाचा स्टेम टरबूज मिळाला तर तो खरेदी करु नका. अशा प्रकारचे टरबूज पूर्णपणे पिकलेले नाहीत. परंतु जर ती त्वरित खाण्याची गरज नसेल; तर त्यांना ठेवू शकता आणि त्यांना 2-4 दिवसात खाऊ शकता. तोपर्यंत ते पक्‍के होवून जातील. आपण खरेदी करत असलेल्या दिवशी टरबूज खायचे असेल तर तपकिरी आणि सुकलेली स्टेम टरबूज खरेदी करावा. अशी टरबूज आतून लाल आणि गोड असते.

टरबूजचे वजन तपासा
टरबूज देखील वजन करणे आवश्यक आहे. बऱ्याच लोकांना भ्रम आहे की हलके वजनाने हलके आणि आकाराने मोठे टरबूज चांगले आहे. परंतु असे नाही; लहान टरबूज देखील चांगले आणि गोड असू शकतात. परंतु त्यांचे वजन कमी असू नये. होय, वजन जास्त असलेले टरबूज अधिक रसदार आणि गोड आहे. म्हणून जेव्हा जेव्हा टरबूज खरेदी करतात, तेव्हा टरबूजचे वजन वेगवेगळ्या हातांनी दोन्ही हाताने मोजा आणि नंतर वजन जास्त असलेल्यांनाच खरेदी करा.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com