

Meetha Pudla Recipe: Easy Wheat Flour & Jaggery Sweet Pancake
esakal
Low-Oil Whole Wheat & Jaggery Breakfast: पावसाळा असो वा हिवाळा, गरमागरम आणि पौष्टिक काहीतरी खाण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. अशा वेळी गुजराती आणि उत्तर भारतीय घरांमध्ये आवडीने बनवला जाणारा 'मीठा पुडला' (Meetha Pudla) किंवा 'मीठा चीला' हा एक उत्तम पर्याय ठरतो. गव्हाचे पीठ आणि गूळ यांपासून बनवला जाणारा हा पदार्थ भारतीय पद्धतीचा 'स्वीट पॅनकेक' मानला जातो. खोल तळलेल्या गुलगुले किंवा गोड भज्यांपेक्षा हा पदार्थ तव्यावर कमी तूप किंवा तेलात शेकला जात असल्याने आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.