
माझी रेसिपी : मेथीचे ढेबरे (वडे)
साहित्य : बाजरीचे पीठ दीड वाटी, गव्हाचे पीठ १ वाटी, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ, १ मोठी वाटी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी, २ चमचे चिरलेली कोथिंबीर, आले-लसूण-मिरचीचा ठेचा २ चमचे, हळद अर्धा चमचा, तिखट १ चमचा, धने-जिरे पूड १ चमचा, मीठ, १ चमचा साखर, ४ ते ५ चमचे तीळ, ३ चमचे सायीचे दही (मी तूप कढवल्यावर राहिलेली बेरी २ चमचे टाकली होती), १ चमचा तेल
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कृती : प्रथम एका मिक्सिंग बाऊलमध्ये पीठाशिवाय सर्व कोरड्या वस्तू मेथी आणि कोथिंबिरीसह छान मिक्स करून घ्याव्यात. त्यात पीठ आणि दही मिक्स करून कणीक मळावी. जरुरीपुरते पाणी वापरावे. कणीक फार घट्ट किंवा फार सैल नसावी. १५ मिनिटे भिजवल्यावर प्लॅस्टिकवर छोटे छोटे वडे थापून गरम तेलामध्ये मध्यम आचेवर तळावे. सोबत हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचअप किंवा दही देऊन सर्व्ह करावे. गरमागरम चहासोबत पण छान लागतात.