esakal | शरीर थंड राहण्यासाठी पुदीना चहाचा आस्वाद घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

शरीर थंड राहण्यासाठी पुदीना चहाचा आस्वाद घ्या

शरीर थंड राहण्यासाठी पुदीना चहाचा आस्वाद घ्या

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

बरेच लोक चहा पिण्यासाठी इतके वेडे असतात की ते बारा महिने आणि कोणत्याही वेळी ते चहा पितात. उन्हाळ्याच्या काळातही हे लोक चहा पिणे सोडत नाहीत. चहाचे अनेक प्रकार आहेत त्यात मसाला चहा, पुदिना चहा, तुलसी चहा, अदरक चहा, गवती चहा आणि बरेच काही. त्यातीलच पुदीना चहा कसा बनवायचा ते जाणून घ्या.

हेही वाचा: World Tea Day: चहा एवढाच त्याचा इतिहाससुद्धा आहे टेस्टी..! पाहा व्हिडीओ..!

साहित्य:

पुदिन्याची पाने 8-10

काळी मिरी- अर्धा चमचा

काळ मीठ - अर्धा चमचा

पाणी - दोन कप

हेही वाचा: इम्युनिटी वाढवण्यासाठी गुळवेल, गवती चहा, काळ्या हळदीची वाढली मागणी ! जाणून घ्या यांचे गुणधर्म

कृती:

- एका कढईत मंद आचेवर पाणी उकळण्यासाठी ठेवा

- त्या पाण्यात पुदीनाची पाने, काळी मिरी आणि काळे मिठ घाला आणि पाच मिनिटे उकळवा. मग गॅस बंद करा.

- पुदिन चहा तयार आहे.

- कपमध्ये पुदीना चहा घेवून त्याचा आस्वाद घ्या.

हेही वाचा: या लाल फुलांचा चहा पळवील तुमचे आजार?

टीप: जर तुम्हाला पुदीना चहा रोजच्या सामान्य चहासारखे बनवायचा असेल तर तुम्ही दूध आणि साखर देखील घालू शकता. पुदीनाची पाने उपलब्ध नसल्यास पुदीना चहाच्या पिशव्याही वापरता येतील.

loading image