esakal | गणपती स्पेशल : गव्हाच्या सत्त्वाचे मोदक
sakal

बोलून बातमी शोधा

गणपती स्पेशल : गव्हाच्या सत्त्वाचे मोदक

गणपती स्पेशल : गव्हाच्या सत्त्वाचे मोदक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहे. सकाळी व सायंकाळी गणपतीची आरती केली जाते. गणपतीला मोदक फार आवडत असल्याने त्याचाच नैवद्य दिला जातो. चला त जाणून घेऊ या गव्हाच्या सत्त्वाचे मोदक करण्याची पद्धत...

लागणारे साहित्य

पारीसाठी ५०० ग्रॅम गहू, चिमूटभर मीठ व पाणी.

सारणासाठी दीड वाटी ओल्या नारळ, दोन टेबल स्पून चॉकलेट पावडर, दोन टेबल स्पून किसलेले डार्क चॉकलेट आणि चार टेबल स्पून पिठी साखर.

असे करा तयार

कुरडईच्या सत्त्वाप्रमाणेच गहू तीन दिवस पाण्यात भिजवून वाटून सत्त्व तयार करा. नंतर सत्त्वाच्या बरोबरीने पाणी उकळायला ठेवून त्यात थोडे मीठ घाला. पाणी उकळल्यावर सत्त्व हलवून त्या पाण्यात घाला. ते सारखे हलवा. मंद आचेवर झाकण ठेवून चिकाला चांगली वाफ घ्यावी. हाताला चिकटणार नाही असा चीक शिजला की लगेच गॅसवरून खाली उतरवून घ्यावा.

हेही वाचा: बुलडाणा : ॲग्रो एजन्सीला आग लागून लाखोंचे नुकसान

सारणाचे साहित्य एकत्र करून ठेवा. चीक गरम असतानाच मोदकाच्या साच्यात लिंबाएवढा गोळा ठेवून त्यात दाबा. त्यात सारण भरून पारी बंद करून हलक्या हाताने साचा काढा. आठ ते दहा मोदक तयार झाल्यावर मोदकपात्रात मोदक ठेवून पाच ते सहा मिनिटे उकडा. गरमागरम मोदक नैवेद्यासाठी ठेवताना वरून फोडून पांढरे लोणी त्यात घाला.

loading image
go to top