

Banana Appe Recipe:
Sakal
सकाळचा नाश्ता हा दिवसाची सुरुवात ऊर्जा आणि चवीनं करण्याचा उत्तम मार्ग असतो. रोजच्या पोहे, उपमा, डोसा किंवा पराठ्यांपासून थोडा बदल हवा असेल, तर आज केळीचे गोड अप्पे तयार करू शकता. पिकलेल्या केळ्यांपासून बनवलेले हे अप्पे खूपच नरम, सुगंधी आणि पौष्टिक असतात. यात गूळ, नारळ आणि थोडंसं तूप वापरल्यामुळे चवीला हलकं गोडसर आणि आरोग्यदायी स्नॅक तयार होतो. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ झटपट तयार होतो आणि त्यासाठी फारशी मेहनतही लागत नाही. सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. चला तर जाणून घेऊया केळीचे गोड अप्पे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.