esakal | आईच्या हातची पुरणपोळी मला सर्वात जास्त प्रिय : प्राजक्ता हनमघर
sakal

बोलून बातमी शोधा

food

आईच्या हातची पुरणपोळी मला सर्वात जास्त प्रिय : प्राजक्ता हनमघर

sakal_logo
By
शब्दांकन : अरुण सुर्वे

मला खाणं प्रचंड आवडते. मी खाण्यासाठी जगते आणि शाकाहारी जरी असले तरी मला विविध शाकाहारी पदार्थ खुप आवडतात. त्यामुळे मी मनसोक्त खाते. माझा सगळ्यात आवडता पदार्थ पुरणपोळी आहे. माझ्या आईची आई खूप सुंदर पुरणपोळ्या करायची. आता मी आणि आईसुद्धा खुप छान पुरणपोळ्या करते. पुरणपोळी हा विशेष आवडीचा पदार्थ आहे.

मी आणि माझा नवरा आमच्या दोघांच्या काही आवडी खूप सारख्या आहे. जसे फिरणं आणि खाणे. यामुळे आम्ही सतत फिरतो अन् तेथील पदार्थाचा आस्वाद घेतो. आम्ही खाण्यासाठी कुठेही जावू शकतो. त्यामुळे आम्हाला प्रवासाचा अजिबात कंटाळा येतं नाही. आम्ही कोल्हापूरला जातो तेव्हा तिथली मिसळ खायला मला खूप आवडते.

पुण्याजवळ नारायणगाव येथेआम्ही सतत खायला जातो. तिथे माझ्या मित्राच चिराग भुजबळ याच श्रीराज नावाचं हॉटेल आहे. तिथली मासवडी मला तर प्रचंड आवडते. नारायणगावला श्रीहरी पांडुरंग नावाचं शाकाहारी हॉटेल आहे, तिथले महाराष्ट्रीयन गोड पदार्थ मला खूप आवडतात. यांची बेकरी पण आहे. बेकरीतील कोकोनट कूकीज मला विशेष आवडीचे आहे. आम्ही दोघे लॉकडाऊन लागण्याआधी इंदोरला खास खाण्याकरिता गेलो होतो. तिथे सराफा गल्लीत दोन रात्र फिरून खूपच खाल्ल. जगात इतक सुंदर शाकाहारी जेवण इंदोरला भेटतं. यामुळे मला पुन्हा एकदा इंदोरला जायचं आहे.

हेही वाचा: रेसिपी : खांडोळीची भाजी

पुण्यात असताना मी चाय कट्टाला नेहमीचं जाते. मला चहा खूप आवडतो. कुकींग करायला मला खूप आवडतं. गोड पदार्थ मला करायला खूप आवडतात. तसेच गोड खायलाही खूप आवडतं. मी मांसाहार खात नसले तरी मी ते छान बनवते. ज्यांनी मी बनवलेला पदार्थ खाल्ला त्यांना तर ते खूप आवडले.

माझा अजुन तर कुठलाच पदार्थ बिघडला नाही. मी दोन रेसिपी शोज होस्ट केले होते. त्यामुळे मला कुकिंगबद्द्ल फार छान माहिती मिळाली आणि आवडीचा विषय असल्यामुळे फार चुकण्याचा प्रसंग आलेलाच नाही.

माझी आई उत्तम स्वयंपाक करते. मला सगळच आवडत तिच्या हातचं. पण भरल वांग आणि पुरणपोळी विशेष आवडते. ती कमाल भाकरी करते आणि तिची भाकरी छान कागदासारखी मऊ, पातळ व लुसलुशीत असते. तशी भाकर तर मला अजून तरी मला नाही जमली. यामुळे मी तिच्या विशेष प्रेमात आहे, तसेच शेपूची भाजी मला अजिबात आवडत नाही.

हेही वाचा: Rose Shake Recipe: 5 मिनिटांत बनवा 'रोज ड्राय फ्रुट शेक'; जाणून घ्या रेसिपी

मला गोड पदार्थ खूप आवडतात .शिरा पण मला खुप आवडतो. पण, लोकांना वाटते की शिरा खूप सोपा आहे. पण, सगळ्यांच्या हातचा शिरा चांगलाच होतो अस नाही. शिरा करतानी मी ज्या वाटीनी रवा मोजते, त्या वाटीनी तूप मोजते, साखर मोजते, सोबतच एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध असं प्रमाण असतं. आधी मी रवा कोरडा भाजून घेते, मग तुपात छान भाजून घेते, मग दूध व पाणी एकत्र गरम करून त्यात घातले आणि झाकण ठेवते. दोन तीन मिनिटांनी छान वाफ आली की झाकण काढून यात साखर घालते. साखर एकजीव झाली की त्यात वेलची पुड, ड्रायफ्रूट आणि केसर घालते आणि खरंच माझा शिरा खूप छान होतो.

मला साऊथ इंडियन थाळी पण खूप आवडते. मी केरला कॅफेला साऊथ इंडियन थाळी खायला जाते आणि भाताबरोबर वेगवेगळे रस्सम आणि त्यांच्या खिरी मला खूप आवडतात.

loading image
go to top