esakal | पोषक-पूरक : ज्वारी I Jawar
sakal

बोलून बातमी शोधा

Jawar

पोषक-पूरक : ज्वारी

sakal_logo
By
मृणाल तुळपुळे

ज्वारी हे एक धान्य असून त्याचा उगम इथिओपियामधला मानला जातो. ज्वारीचा दाणा काहीसा लहान मोत्यासारखा दिसतो म्हणून त्याला ‘पर्ल मिलेट’ असे म्हटले जाते. आपल्याकडे ज्वारीला ‘जोंधळा’ही म्हटले जाते.

आफ्रिकेमध्ये पूर्वापार ज्वारीची उकड व भाज्या घालून शिजवलेल्या ज्वारीच्या कण्या खाल्ल्या जातात. आपल्याकडे मात्र ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरी करण्यासाठी केला जातो. ही भाकरी गोडसर चवीची व पांढरट रंगाची असून पचण्यास हलकी व आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आहे. ग्रामीण भागात लोक ज्वारीला मुख्य अन्न म्हणून प्राधान्य देतात.

ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, फायबर, प्रथिने, पोटॅशियम आणि आयर्न असते. हे सर्व घटक उत्तम प्रकृती स्वास्थ्यासाठी आवश्यक असतात. ज्वारीतून शरीराला पटकन ऊर्जा मिळते व कमी खाऊनदेखील पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये ग्लुटेन नसते, त्यामुळे ग्लूटेन इन्टॉलरन्स असलेल्या लोकांना पोळीऐवजी ज्वारीची भाकरी खाणे इष्ट ठरते. ज्वारीच्या सेवनामुळे शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण नियंत्रित रहात असल्यामुळे मधुमेही लोकांसाठी ती खाणे खूप फायदेशीर ठरते

ज्वारीचे दाणे फुलवून लाह्या केल्या जातात. या लाह्या पचायला अतिशय हलक्या असतात. ज्वारीचे पीठ शिजवून त्याच्या पापड्या केल्या जातात; तसेच थालीपिठाच्या भाजणीत ज्वारीचा वापर केला जातो. आपले आरोग्य उत्तम राखायचे असेल तर ज्वारीला रोजच्या आहारात प्राधान्य द्यावे.

loading image
go to top