Soup Recipe : हिवाळ्यात प्या गरमा-गरम मूग दाळीचं सूप, वजन होणार झटक्यात कमी

मूग दाळीचं सूप तुम्हाला वजन नियंत्रण ठेवण्यासही मदत करते.
Soup Recipe
Soup Recipesakal

हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उत्तम खानपान असेल तर आरोग्यही उत्तम असते. अशात हिवाळ्यात गरमा गरम सूप जर तुम्ही पिलात तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर असू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मूग दाळीचं सूप कसं करायचं, हे सांगणार आहोत. मूग दाळीचं सूप तुम्हाला वजन नियंत्रण ठेवण्यासही मदत करते.

साहित्य -

  • १ वाटी अख्खे मूग

  • १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर

  • १ छोटा चमचा जिरे १-२ मिरच्या

  • १ कांदा बारीक कापून चिमूटभर हळद मीठ काळी मिरी पूड चमचाभर तूप

कृती -

  • कुकरमध्ये तूप तापवून जिऱ्याची फोडणी करा

  • त्यात कांदा-मिरचीचे तुकडे परतून घ्या

  • हळद टाकून हलवून घ्या, त्यात धुतलेले मूग ५ वाट्या पाणी टाकून तीन ते चार शिट्यांवर शिजवून घ्या.

  • कुकर गार झाल्यावर शिजलेले मूग रवीने ढवळून घ्या किंवा मिक्सरला लावून घ्या.

  • मीठ, मीरपूड टाकून एकदा उकळी काढा. वरून कोथिंबीर घालून गरमागरम सूप तथा शोरब्याचा आस्वाद घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com