नॉर्थ इंडियन स्पेशल डिश; कढाई मशरूम नक्की ट्राय करा

आज मशरूमची नॉर्थ इंडियन डीश आपण पाहणार आहोत
नॉर्थ इंडियन स्पेशल डिश; कढाई मशरूम नक्की ट्राय करा

कोल्हापूर : तुम्ही जर कधी एखाद्या नॉर्थ इंडियनरेस्टॉरंटमध्ये गेला असाल आणि मेनू कार्ड चेक केले असेल तर त्यामध्ये फक्त कढाई पनीर आणि पनीर टिक्का या दोनच डीश दिसतात. कढाई हे एका मोठ्या पदार्थ बनण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भांड्याला म्हंटल जाते. ज्यामध्ये अनेक मसाले, कांदा, सिमला मिरची, टोमॅटो यांसारख्या भाज्या एकत्र शिजवल्या जातात. या भाज्यांना मसाला सोबत कितीतरी वेळा हलवले जाते. आणि यामुळे या पासून बनणारे पदार्थ लालभुरे अशा रंगाचे असतात. अनेक मसाल्यांचा उपयोग करून भाज्यांमध्ये वापरले जाते. हे फक्त स्वाद देत नाहीत तर त्यामुळे पदार्थांची चवही वाढते. या मसाल्यांमध्ये तुम्ही कोणतीही भाजी मिक्स करू शकता. चिकन, पनीर यामध्ये साधारणतः हे मिक्स केले जाते. तसेच तुम्ही या मसाल्यांमध्ये मशरूमही मिक्स करु शकता. कढाई मशरूम रेसिपी बनवू शकता. ही रेसिपी देसी लंच किंवा डीनरसाठी उत्तम आहे. तुम्ही तुमच्या सलाडमध्येही मशरूमचा वापर सर्रास करत असाल. तर आज मशरूमची नोर्थिंडियन डीश आपण पाहणार आहोत...

बनवण्याची पद्धत

एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा आणि यामध्ये कांदा आणि शिमला मिरची घाला. पाच मिनिटांसाठी ते भाजून घ्या. या भाज्यांना बाजूला काढून त्यामध्ये मशरूम घाला आणि तेही पाच मिनिटांसाठी भाजून घेऊन बाहेर काढा. आता पॅनमध्ये थोडे तेल वाढवा आणि यामध्ये चिरलेला कांदा घाला. तो ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घाला. हे मिश्रण एकत्र करा. त्यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून तीन मिनिटांसाठी हे मिश्रण शिजू द्या. त्यानंतर यामध्ये मीट मसाला, हिरवी मिरची, जिरे पावडर, धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर, मीट मसाला, गरम मसाला हे सगळे एकत्र करून द्या. यात पाणी घालून हे मिश्रण पाच मिनिटांसाठी उकळून घ्या. कस्तुरी मेथी आणि क्रिम घालून फ्राय करा. आता यामध्ये तळलेला कांदा, सिमला मिरची मशरूम घाला आणि हे मिश्रण एकत्र करून तीन ते चार मिनिटांसाठी शिजवून घ्या. त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर घालून गार्निंशिंग करा. तुमची नॉर्थ इंडियन डीश तयार आहे.

नॉर्थ इंडियन स्पेशल डिश; कढाई मशरूम नक्की ट्राय करा
"पण आडवा आला अहंकार"; भाजपची सरकारवर बोचरी टीका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com