Health: उत्तम आरोग्य आणि उत्तम चव देणारे नाचणीचे लाडू कसे तयार करायचे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nachaniche Ladoo

Health: उत्तम आरोग्य आणि उत्तम चव देणारे नाचणीचे लाडू कसे तयार करायचे?

तुम्हाला जर का आरोग्यदायी नाचणीचा नियमितपणे आहारात समावेश केल्यास तुम्ही नक्कीच तंदुरुस्त राहू शकता. नाचणी शरीराला अनेक कारणांसाठी उपयुक्त असते. त्याचे फायदे वेळीच समजून घेतल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते. नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. तांदूळ आणि गहू आणि ज्वारी पेक्षा किती तरी पटीने जास्त पोषकद्रव्ये नाचणीमध्ये असतात.

चला तर मग आज बघू या ,बहुगुणी नाचणीचे लाडू कसे तयार करायचे?

साहित्य:

1) दीड वाटी नाचणीचे पीठ

2) अर्धा वाटी साजूक तूप (वितळलेले)

3) एक वाटी पिठी साखर

4) कप जाडे पोहे

5) वेलची पूड

6) खोबरा किस

7) थोडसं दुध

8) काजू,बदामाचे बारीक काप

हेही वाचा: Sweet potato sheera : पौष्टिक असणाऱ्या रताळ्याचा शिरा कसा तयार करायचा ?

कृती:

तूप कढईत घेउन गरम होवू द्यावे. त्यात पोहे तळावेत. पोहे पटकन जळतात म्हणून फुलले की लगेच बाहेर काढावेत. याच तुपात नाचणीचे पीठ घालून मंद अच्वर भाजावे. साधारण 10 ते 15 मिनिटे किंवा पीठ भाजल्याचा छान वास येईपर्यंत भाजावे. सतत ढवळत राहा. ढवळायचे थांबल्यास पीठ जळण्याची शक्यता असते.पीठ छान भाजले गेले की त्यात दुध घाला. दुध घातल्यावर पीठ फसफसेल. मग छान ढवळा. नंतर मग गॅस बंद करावा.मिश्रण कोमट झाले की त्यात तळलेले पोहे बारीक करुन टाकावे नंतर भाजलेले सुके खोबरे, वेलची पूड, पिठीसाखर आणि सुकामेवा घालून हे लाडूचे मिश्रण छान एकत्र करावे. आणि नंतर लाडू तयार करावे.

Web Title: Nachaniche Ladoo How To Prepare These Ladoo Who Give Good Health And Good Taste

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..