थोडक्यात: नागपंचमीच्या दिवशी घरच्या घरी पौष्टिक ज्वारीच्या लाह्या सहज बनवता येतात.या लाह्या बनवण्यासाठी ज्वारी थोडी शिजवून सुकवली जाते आणि नंतर गरम कढईत फुलवली जाते.तयार लाह्या कुरकुरीत, आरोग्यदायी असून हवाबंद डब्यात दीर्घकाळ टिकतात..Healthy Jowari Lahya Recipe: नागपंचमी हा श्रावण महिन्यात येणारा एक पवित्र आणि पारंपरिक सण आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांना दूध, फूल आणि लाह्या अर्पण केल्या जातात. याच सणानिमित्त आपण घरच्या घरी बनवू शकतो पौष्टिक आणि कुरकुरीत ज्वारीच्या लाह्या, ज्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतात..Healthy Lifestyle Tips: निरोगी आयुष्यासाठी खा ‘ही’ कोरडवाहू भागातील रानभाज्या, जाणून घ्या त्यांचे अप्रतिम फायदे.पावसाळा सुरू झाला की सर्वत्र लाह्या करणाऱ्या भट्ट्या चालू होतात. पूर्वी लाह्या प्रामुख्याने कावळी ज्वारीपासून बनवल्या जात. मात्र अलीकडे कावळी ज्वारीचे उत्पादन कमी झाल्यामुळे सध्या सामान्य ज्वारीपासूनही लाह्या तयार केल्या जात आहेत. चला तर मग, लगेच लिहून घ्या ही पारंपरिक आणि पौष्टिक ज्वारीच्या लाह्यांची रेसिपी....साहित्य:1. ज्वारी – १ कप2. पाणी – २ ग्लास3. चाळणी4. जाड बुडाची कढई.Hair Care Tips: सतत केस स्ट्रेट करताय? थांबा...आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम.कृती:पाणी उकळणेएका पातेल्यात २ ग्लास पाणी गरम करायला ठेवा.ज्वारी टाकणे आणि थोडं शिजवणेपाणी उकळू लागल्यावर त्यात १ कप ज्वारी टाका.१–२ मिनिटं मध्यम आचेवर उकळा. ज्वारी पूर्ण शिजवायची नाही, फक्त थोडी फुलायला हवी.गाळणे आणि वाळवणेउकळलेली ज्वारी गाळून घ्या आणि ती एका स्वच्छ कापडावर पसरवून रात्रभर किंवा ७–८ तास सुकवून ठेवा.लाह्या फुलवणेदुसऱ्या दिवशी जाड बुडाची कढई गरम करा. ती व्यवस्थित तापल्यावर त्यात थोडी थोडी सुकवलेली ज्वारी टाका. ज्वारी गरम आचेला लागल्यावर फसफसत फुलेल म्हणजेच लाह्या तयार होतील.थंड करणे आणि साठवणेतयार झालेल्या लाह्या थंड करून हवाबंद डब्यात भरून ठेवा..FAQs१. ज्वारी कोणती वापरावी? (Which type of jowar should be used?)पारंपरिकपणे कावळी ज्वारी वापरली जाते, पण सध्या सामान्य ज्वारी वापरूनही लाह्या चांगल्या होतात.२. ज्वारी शिजवताना ती पूर्ण शिजवावी का? (Should jowar be fully cooked while boiling?)नाही, फक्त थोडीशी फुलवायची असते पूर्ण शिजवायची नाही.३. लाह्या फुलवताना आंच कशी ठेवावी? (What should be the flame level while puffing the jowar?)कढई व्यवस्थित गरम करून मध्यम ते उच्च आंच ठेवावी, जेणेकरून ज्वारी नीट फुलेल.४. लाह्या किती दिवस टिकतात? (How long do these puffed jowar last?)लाह्या एअरटाइट डब्यात ठेवल्यास १५–२० दिवस टिकतात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.