चिंचेचे सार कधी तयार केले आहे का? ही आहे सोपी पद्धत

टीम ई सकाळ
Tuesday, 16 February 2021

चिंचेचे सार ही एक लोकप्रिय सूप रेसिपी आहे. जी दक्षिण भारतात फार प्रसिद्ध आहे. हे एक पातळ स्वरुपातील सूप आहे. ते चिंचेच्या पाण्याने आणि घरी उपलब्ध असणाऱ्या झणझणीत रसम मसाल्याचा वापर करून तयार केले जाते.

नागपूर : ख्रिस्तपूर्व काळात कधीतरी आफ्रिकेतून भारतात आलेली चिंच कालांतराने इतकी पसरली की तिच्या आंबटगोड चवीची भुरळ जगभरातील खाद्यसंस्कृतींना पडली. मग ते आपले चिंचेचे सार असो की व्हिएतमानी कान्ह चुआ. तापात आणि कुंद हिवाळी हवेत काही तोंडाला चव आणणारे आणि खमंग असे काही खावे असे वाटत असेल तर चिंचेचे सार तर हमखास सुचते. साधीशी कृती आणि चव तर अप्रतिम. किंचित आंबटगोड तर मध्येच किंचित तिखट, एखादा चुकार दाणा मेथीचा आणि त्यावर हिंगाच्या चवीचा तुपाचा स्वाद.

चिंचेचे सार ही एक लोकप्रिय सूप रेसिपी आहे. जी दक्षिण भारतात फार प्रसिद्ध आहे. हे एक पातळ स्वरुपातील सूप आहे. ते चिंचेच्या पाण्याने आणि घरी उपलब्ध असणाऱ्या झणझणीत रसम मसाल्याचा वापर करून तयार केले जाते.

अधिक वाचा - ‘मुलांनो, आम्हाला माफ करा; आमचे मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा’ अशी चिठ्ठी लिहून दाम्पत्याची आत्महत्या

या साऊथ इंडियन रसम डीशला इमली रसम असेही म्हटले जाते. त्याला अगदी हलक्या प्रमाणात गुळाचा स्वाद देखील असतो. आंबटगोड फ्लेवरची ही डीश जेवणाची चव वाढवते. या स्वादिष्ट डीशचा आपण गरमा गरम भातासोबत आस्वाद घेऊ शकतो. चला तर लोकप्रसिद्ध साऊथ इंडियन रसम बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया...

महत्त्वाची सामग्री
एक चमचा मोहरीच्या बिया, एक चमचा जिऱ्याच्या बिया, हळद, सहा लसूण, हिंग, लाल मिरची, कढीपत्ता, पन्नास ग्रॅम गुळ, पन्न्स ग्रॅम चिंच, पाणी, दोन चमचे तूप, एक चमचा रसम पावडर.

साजूक तुपात मोहरी, जिरे, हळद, हिंग, लाल मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि कडीपत्ता घाला. यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घेऊन गरम करा. त्यामध्ये एक चमचा मोहरी, एक चमचा जिरे, चिमुटभर हळद, चिमुटभर हिंग, दोन ते तीन लाल मिरच्या, सहा लसणाच्या पाकळ्या आणि कडीपत्ता घाला. तुपात मोहरी, जिरे, हळद, हिंग, लाल मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि कडीपत्ता घाला.

मिश्रणात पाणी घालून त्यात चवीनुसार गुळ, चिंच आणि मीठ घाला. सर्व सामग्री दोन मिनिट परतून घ्या. आता दोन मिनिट गरम पाण्यात भिजवून घेतलेली चिंच सामग्रीमध्ये मिक्स करा. आता त्यामध्ये पाणी घालून चवीनुसार गुळ आणि मीठ घाला. रसम पावडर टाकून सर्व सामग्री चांगली शिजवून घ्या. मिश्रण व्यवस्थित मिक्स करा जेणे करून गुळ आणि चिंच पाण्यात चांगली विरघळेल. आता त्यात रसम पावडर टाकून सर्व सामग्री चांगली शिजवून घ्या.

जाणून घ्या - जेवणासाठी बाहेर गेलेल्या मुलाची २८ दिवासांनी फक्त मिळाली कवटी; टी-शर्ट बघताच आईने फोडला हंबरडा

सामग्री चांगली शिजून मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा. तयार झाले गरमा गरम आणि स्वादिष्ट साऊथ इंडियन रसम किंवा चिंचेचे सार. आता गरमा गरम भातासोबत तुम्ही या रसमचा आस्वाद घेऊ शकता किंवा पचण्यास अतिशय लाभदायक असणाऱ्या या रसमचा तुम्ही सूप म्हणून देखील आनंद लुटू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur news Has tamarind essence ever created This is the simple method