तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर एकदा तयार करा वेजिटेबल दालीया

If you are fond of food make vegetable dahlia once
If you are fond of food make vegetable dahlia once

नागपूर : काही लोकांना सतत खायची सवय असते. काहीना काही खात राहावे असे त्यांना वाटते. दुपार झाली की त्यांची भूक अधिक तीव्र होते. काहीतरी खाल्याशिवाय त्यांना बर वाटत नाही. तसेही भूक लागली की काहीतरी खाल्लं पाहिजे. अशा खवय्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहे वेजिटेबल (भाजीपाला) दालीया.

वेजिटेबल ओट चांगल्या पौष्टिक आहापैकी एक आहे. यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी आहे. तसेच फायबर, विटामीन आणि मीनरल्स मोठ्या प्रमाणात आहे. हे तयार करण्याची पद्धत खूप सोपी आहे. चला तर जाणून घेऊया ही तयार करण्याची पद्धत...

लागणारी सामग्री

एक कप कोबी, एक कप गाजर, एक कप ग्रीन कॅप्सिकम, एक कप टोमॅटो, एक कप कांदा, चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल मिरची, जिरे भाजलेले, मीठ, एक कप ओटचे जाडे भरडे पीठ, दोन चम्मच तूप व लिंबाचा रस.

असे करा तयार

सर्वांत एका कढईत तूप टाका. तूप गरम झाल्यावर दालीया टाकून तीन ते चार मिनिट शिजू द्या. यानंतर एका कुकरमध्ये मीठ घालून लापशी घाला. यानंतर पाणी घाला. पण लक्षात ठेवा की पाणी आणि ओटचे पीठ यांचे प्रमाण ३:१ असावे. यानंतर कुकरचे झाकण बंद करून दोन शिटी येईपर्यंत शिजवा. एका कढईत तूप आणि कांदे टाकून परतून घ्या. नंतर फुलकोबी व गाजर घाला.

आता कमी आचेवर शिजू द्या. मिश्रणात मटर आणि टोमॅटो टाकून शिजू द्या. कच्च्या टोमॅटोची कच्ची सुगंध येईपर्यंत मिश्रण शिजवा. यानंतर शिमला मिरची, हळद, मिरची पूड आणि जिरे घालून फ्राय करून घ्या. आता कुकरमधून ओटची फोडणी काढून ते भाज्या मिश्रणात मिक्स करा. सर्व साहित्य एका गॅसवर एक मिनिट शिजवा. आता तुमची वेजिटेबल दालीया तयार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com