esakal | Recipe : नागपुरी गोळा भात
sakal

बोलून बातमी शोधा

gola bhat

Recipe : नागपुरी गोळा भात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य: भातासाठी

  • ३/४ कप बासमती तांदूळ

  • तांदुळाच्या दुप्पट गरम पाणी

  • १/२ टीस्पून मीठ

  • १/२ टीस्पून जिरे

  • २ टेबलस्पून तेल

गोळ्यासाठी

१/२ कप ते ३/४ कप बेसन

१/२ टीस्पून ओवा

१ टीस्पून धणेपूड

१ टीस्पून जिरेपूड

१/२ टीस्पून हळद

१/२ टीस्पून लाल तिखट

१/२ टीस्पून साखर

मीठ चवीप्रमाणे

२ टीस्पून कडकडीत गरम तेलाचे मोहन पीठ कालवण्यासाठी थोडेसे पाणी

फोडणीसाठी-

  • १/४ ते १/२ कप तेल

  • ३-४ सुक्या मिरच्या

  • १/४ टीस्पून मोहरी

  • १/४ टीस्पून हिंग

हेही वाचा: रेसिपी : चॉकलेट मोदक 

कृती:

१. एका बाऊलमध्ये बेसन घ्या. त्यात मीठ,साखर,ओवा, धने-जिरेपूड, हळद आणि तिखट घालून एकत्र करा. कडकडीत तेलाचे मोहन घालून मिक्स करा. किंचित पाणी घालून कालवून घ्या.मिश्रण चिकट होईल इतकेच पाणी घाला. मिश्रण पातळ करू नका.

२. १० मिनिटे आधीच तांदूळ धुवून ठेवा. पातेल्यात तेल गरम करा आणि जिरे फोडणीला घाला. जि-याचा खमंग वास आला की, धुतलेले तांदूळ घालून परता. ३-४ मिनिटे तांदूळ सुटसुटीत होईपर्यंत परतून घ्या. तांदुळाच्या दुप्पट (इथे १ १/२ कप) गरम पाणी आणि मीठ घालून घाला. झाकण ठेवून भात शिजवत ठेवा. भात पूर्ण शिजायच्या थोडा आधी, मिश्रणाचे गोळे करून मध्ये मध्ये घाला. झाकण ठेवून मध्यम आचेवर भात पूर्ण शिजवून घ्या. भाताबरोबर गोळे सुद्धा शिजले जातील.

३. दुसरीकडे छोट्या कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले की, मोहरी घाला. मोहरी तडतडली की, सुक्या मिरच्या २ तुकडे करून घाला. फोडणी पूर्ण गार होऊ द्या.

जेवताना भातावर प्रत्येकी १ ते २ टेबलस्पून तेल घ्या. फोडणीतली मिरची आणि गोळा भातामध्ये कुस्करून गोळा भाताचा आस्वाद घ्या.

सोबत कैरीचे सार किंवा आमसुलाचे सार द्या.

loading image
go to top