esakal | पोषक-पूरक : गुणकारी बदाम । Almonds
sakal

बोलून बातमी शोधा

पोषक-पूरक : गुणकारी बदाम

पोषक-पूरक : गुणकारी बदाम

sakal_logo
By
मृणाल तुळपुळे

बदामाला आपण ‘ड्राय फ्रूट’ म्हणत असलो, तरी ती एका फळातली बी आहे. ही फळे झाडावर उकलली, की ती काढून त्यातल्या बिया वेगळ्या करतात. या बिया म्हणजेच सालासकट बदाम; वरचे कठीण साल फोडले, की आतला बदाम खाण्यासाठी योग्य होतो. सुक्या मेव्यातील पदार्थांमधे बदाम सर्वाधिक पौष्टिक मानले जातात.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांचा मराठवाडा दौरा आणि पंकजा मुंडे आजारी

बदाम किंचित गोडसर चवीचे व कडक असतात. कोमट पाण्यात भिजवले असता त्यावरची पातळ साल निघते. आतल्या पांढऱ्या शुभ्र बदामाचे काप वा कूट करून ते खीर, शिरा, श्रीखंड अशा पक्वान्नांमध्ये घातले जातात. बदामाची बिस्किटे, केक्स, पुडिंग्ज असे पदार्थ बनवले जातात, तर काही वेळा ते भाजून वा खारवून खाल्ले जातात. हल्ली वेगन लोकांसाठी दुधाला पर्याय म्हणून बदामाचे दूध वा पेस्ट बनवली जाते.

खाण्याव्यतिरिक्त बदामाचे आणखीही बरेच उपयोग आहेत. बदामाचे तेल केसांच्या वाढीसाठी; तसेच मालिश करण्यासाठी उत्तम मानले जाते. चेहरा तजेलदार दिसण्यासाठी त्यावर बदामाची पेस्ट लावली जाते. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये बदामाचा वापर केला जातो.

हेही वाचा: वयाच्या 30 व्या वर्षात महिलांनी 'या' 5 सप्लीमेंट्स घ्याव्यात

बदामातून ई जीवनसत्त्व, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि मॅग्नेशियम अशी खनिजे, प्रथिने आणि फायबर मिळत असल्यामुळे उत्तम आरोग्यासाठी रोज पाच ते सहा भिजवलेले बदाम खाणे योग्य ठरते. त्यामुळे उच्च रक्तदाब कोलेस्टेरॉल व रक्तातील साखर नियंत्रित राहते. बदामात असलेल्या वेगवेगळ्या खनिजांची हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते. लहान मुलांना त्यांची बौद्धिक कार्यक्षमता वाढण्यासाठी बदाम दिले जातात. सध्याच्या करोना काळात शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टर रोज बदाम खाण्याची शिफारस करतात.

मृणाल तुळपुळे

loading image
go to top