पौष्टिक सॅलड 

डॉ. मनीषा बंदिस्ती 
Tuesday, 18 August 2020

आयर्न म्हणजे लोह, मॅग्नेशिअम, झिंक, सेलेनियम, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि उत्तम दर्जाची प्रोटिन्स यांचाही अशा पोषकद्रव्यांमध्ये समावेश होतो. या इम्युनिटी बूस्टर मालिकेमध्ये आपण असे काही पदार्थ बघणार आहोत.

पौष्टिक सॅलड 
आपल्याकडे अनेक महत्त्वाची पोषकद्रव्ये उपलब्ध आहेत, त्यांचे रोज सेवन केल्यास रोगप्रतिकारकशक्ती उत्तम बनू शकते. या पोषकद्रव्यांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘ई’ यांचा समावेश होतो. आयर्न म्हणजे लोह, मॅग्नेशिअम, झिंक, सेलेनियम, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि उत्तम दर्जाची प्रोटिन्स यांचाही अशा पोषकद्रव्यांमध्ये समावेश होतो. या इम्युनिटी बूस्टर मालिकेमध्ये आपण असे काही पदार्थ बघणार आहोत, ज्यांच्यामध्ये वर उल्लेख केलेली एक किंवा जास्त पोषकद्रव्ये असतील आणि जी रोजच्या आहारात सहजपणे समाविष्ट करता येतील. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बदाम 
- बदामांमध्ये प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन-ई मोठ्या प्रमाणात असतात. ते आपल्या रोगप्रतिकार यंत्रणेसाठी आवश्यक असतात. 
- त्यांच्यामध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स समाविष्ट असतात. 
- भिजवलेले बदाम पचनासाठी हलके असतात. त्यामुळे बदामांमधली इतर काही पोषकद्रव्येही सहजपणे पचू शकतात. 
- बदामांच्या सालींमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे ती तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी आणि पचनासाठी चांगली असतात. 
- बदामांमध्ये कॅल्शिअम, आयर्न, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, पोटॅशियम, मॅग्नेशिअम, फोलेट, झिंक आणि सेलेनियम इत्यादीही भरपूर प्रमाणात असतात. 
- कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी बदाम उपयुक्त ठरतात. 
- रक्तातल्या साखरेची पातळी आणि रक्तदाब यांच्याबाबतही ते मदत करू शकतात. 
- बदाम त्वचेसाठीही उपयुक्त ठरतात. 
- ताण कमी करण्यासाठी बदाम मदत करतात. 
- अँटी-एजिंग म्हणजे वार्धक्याच्या खुणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या घटकांमध्येही बदामाचा समावेश होतो. 

सूर्यफुलाच्या बिया 

- सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असतात. 
- या बिया अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करतात आणि तुमच्या रोगप्रतिकार यंत्रणेसाठी त्या महत्त्वाची भूमिका बजावतात. 
- व्हिटॅमिन-ईचे इतर फायदे : रक्तदाब, हृदयाचे आरोग्य, कोलेस्टेरॉलची पातळी, साखरेची पातळी या सगळ्यांच्या बाबतीत मदत करतात. त्वचेसाठी चांगले असतात, सुजणे कमी करण्यासाठी मदत करतात आणि कॅन्सरला प्रतिबंध करणारे गुणधर्मही त्यांच्यात असतात. 
- व्हिटॅमिन-ई भरपूर प्रमाणात असलेले अन्नघटक म्हणजे बदाम, पालक, ब्रोकोली, हेझलनट, शेंगदाणे, ॲव्होकॅडो, आंबा, किवी इत्यादी. 

व्हिटॅमिन-ईने युक्त सॅलड 
- एका बाऊलमध्ये मूठभर शिजवलेली ब्रोकोली घ्या. 
- तीन मुठी इतकी धुतलेली आणि चिरलेली पालकाची पाने आणि एक चिरलेले अव्होकॅडो. 
- साली काढलेले आणि कुटलेले तीन टेबलस्पून बदाम. 
- थोडे मीठ आणि एक टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल घाला. 
- ताजे लिंबू पिळा. 
- एक टेबलस्पून मध (असल्यास). 
- थोडी काळी मिरी भुरभुरा. 
- हे सगळे पदार्थ योग्य पद्धतीने मिसळा. 
- एक टेबलस्पून सूर्यफुलांच्या बिया त्यावर भुरभुरा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nutritious salad

Tags
टॉपिकस
Topic Tags: