
शेवटच्या श्रावणी सोमवारी उपवासासाठी फळे, दही आणि मधासह बनवलेली स्मूदी ऊर्जा आणि पोषण प्रदान करते.
केळी, सफरचंद, दही, मध आणि बर्फासह 5 मिनिटांत स्मूदी तयार करा, जी उपवासात सात्त्विक आणि पचायला हलकी आहे.
ही स्मूदी पचन सुधारते, हायड्रेशन राखते आणि उपवासादरम्यान थकवा टाळून तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते.
Energy-boosting smoothie for fasting: श्रावणी सोमवार हा भगवान शंकराला समर्पित आहे. या काळात महादेवाची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. आज शेवटचा श्रावणी सोमवार तर अधिक महत्त्वाचा आहे. या दिवशी उपवास करताना शरीराला ऊर्जा आणि पोषण देणारी सात्त्विक रेसिपी निवडणे गरजेचे आहे. यासाठी पौष्टिक स्मूदी हा उत्तम पर्याय आहे, जो बनवायला सोपा, हलका आणि उपवासाला अनुकूल आहे. केळीपासून स्मूदी तयार करणे सोपे असून झटपट तयार होते. तुम्हाला दिवसभर उत्साही आणि ताजेतवाने ठेवते. या स्मदीमध्ये फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जी पचन सुधारते, हायड्रेशन राखते आणि उपवासादरम्यान थकवा येऊ देत नाही. चला तर मग जाणून घेऊया केळी स्मूदी बवनण्यसाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.