
Healthy oats beetroot dosa
Sakal
How to make instant oats beetroot dosa: सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी पौष्टिक आणि झटपट बनवायचे असेल, तर ओट्स आणि बीटचा डोसा हा उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी बनवायला सोपी, कमी वेळ लागणारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ओट्स फायबरने समृद्ध असल्याने पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात मदत होते, तर बीटरूट आयर्न, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्सने भरपूर आहे. ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि ऊर्जा वाढते. या डोसाचा गुलाबी रंग मुलांना आणि मोठ्यांना आकर्षित करतो, आणि याला फर्मेंटेशनची गरज नसल्याने सकाळी घाईतही सहज तयार होतो. चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह केला तर हा डोसा नाश्त्याला एक स्वादिष्ट आणि रंगीत ट्विस्ट आणतो.