Orange Peel Kuzhambu Recipe
sakal
Delicious Orange Peel Curry from Tamil Nadu: कधी ऐकलंय संत्र्याच्या सालीची भाजी? ऐकून विश्वास बसत नाहीये ना? पण दक्षिण भारतात, खासकरून तमिळनाडू मध्ये पारंपारिक पद्धतीने संत्राच्या सालीची भाजी बनवली जाते, जिला कुलंबू किंवा कुझंबू म्हणतात. दक्षिण भारतात खूप लोकप्रिय असलेलं हे कुझंबू आंबट, गोड आणि तिखट चवीचं असतं. ही आमटी भात, डोसा किंवा इडलीसोबत अप्रतिम लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे.