
Palak pudla recipe
Sakal
सकाळचा नाश्ता हा दिवसाची सुरुवात ऊर्जेने आणि चविष्ट पदार्थांसह करणारा असावा. पालक पुडला ही अशीच एक सोपी, पौष्टिक आणि झटपट बनणारी रेसिपी आहे, जी 15 मिनिटांत तयार होते. पालकामध्ये लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक असतात, तर पुडला हा बेसन आणि मसाल्यांचा स्वादिष्ट मिश्रणाने बनतो. हा पदार्थ केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही उत्तम आहे. सकाळच्या धावपळीत तुम्हाला झटपट बनणारा पदार्थ हवा असेल ही रेसिपी नक्की ट्राय करा. हा पदार्थ मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. चला जाणून घेऊया पालक पुडला बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.