झटपट तयार होणारी खास चवीची चटपटीत रेसिपी; पेपर पनीर कशी बनवाल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झटपट तयार होणारी खास चवीची चटपटीत रेसिपी; पेपर पनीर कशी बनवाल?

झटपट तयार होणारी खास चवीची चटपटीत रेसिपी; पेपर पनीर कशी बनवाल?

जर तुम्ही दुपारच्या जेवणासाठी एखादी तडखफडख आणि काही वेळात तयार होणारी एखादी रेसिपी शोधत असाल तर हे काळी मिरीपूड पनीर हा एक उत्तम पर्याय आहे. भाजलेले मसाले या डिशला स्मोकी चव देतात, तर टोमॅटो आणि कांदे त्यात झिंग घालतात. त्यामुळे अनेकांना आवडणारी हे रेसिपी बनवायला सोपी आहे. घरी अनेकांना तिखट किंवा स्पाईसी खायला आवडत असते. असा सर्वांसाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे. आज आपण ही रिसेपी कशी तयार करावी पाहणार आहोत.

हेही वाचा: प्रेगनेंसीमध्ये बाळाच्या सुदृढ वाढीसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश कराल?

साहित्य -

२ सुक्या लाल मिरच्या, ४-५ काळी मिरी, १ लवंग, १ तमालपत्र, १/२ टीस्पून धणे, १/२ टीस्पून जिरे, मीठ, ४ लसणाच्या पाकळ्या, शेंगा, १ टीस्पून आले, १ टोमॅटो, १ कांदा, २५० ग्राम पनीर

कृती -

धणे, एक लवंग, आले, लसूण, मेथी, जिरे, सुक्या लाल मिरच्या, काळी मिरी आणि तमालपत्र तळून घ्या. हे सर्व भाजून झाल्यावर ते मिक्स करून बाजूला ठेवा. आता कढई घ्या, त्यात थोडे तेल टाका आणि नंतर त्यात कांदे घाला. टोमॅटो घालून ते उकळवून घ्या. मसाले मिक्स झाले की त्यात थोडे मीठ टाका. त्यात शेवटी पनीरचे चौकोनी तुकडे टाका आणि चांगले मिसळून त्याचा आनंद घ्या. तुमची गरमागरम मिरीपूड पनीर म्हणजेच पेपर पनीर रेसिपी खाण्यासाठी तयार आहे.

हेही वाचा: Tourism : प्रवास करताना कोणत्या चूका टाळाव्या?