esakal | रेसिपी : चंद्रपुरी डाळींचे वडे
sakal

बोलून बातमी शोधा

recipe

रेसिपी : चंद्रपुरी डाळींचे वडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुठलाही सण असला की विदर्भात डाळींचे वडे केले जातात. वडा-पुरण हा खास वैदर्भीय बेत. वडा-भात, त्यावर हिंगाचे तेल आणि कढी हे तर खात खवय्यांचे खाणे.जाणुन घेऊया या वड्यांची रेसिपी.

४० मिनिटे

साहित्य :

 • ३ व्यक्तींसाठी

 • १ वाटी चणा डाळ

 • १/२ वाटी मुग मोगर

 • १/२ वाटी मुगाची सालाची डाळ

 • १/२ वाटी लाखोळीची डाळ

 • तळण्यासाठी तेल

 • १ टेबलस्पून तिखट

 • १ टीस्पून हळद

 • २ टीस्पून ओवा

 • २ टीस्पून तीळ

 • २ टीस्पून अद्रक पेस्ट

 • कढीपत्ता पाने

 • कोथींबीर

 • चवी नुसार मीठ

हेही वाचा: Recipe : नागपुरी गोळा भात

कृती : सर्व प्रकारच्या डाळी २ ते ३ तास पाण्यात भिजवुन घ्याव्या व त्याचे पाणी निथळून घ्यावे. मुगाची डाळ थोडी बाजूला काढून ठेवावी आणि बाकी सर्व डाळी मिक्सर मध्ये बारीक करून घ्याव्या. या डाळी मध्ये बाजूला काढून ठेवलेली डाळ मिक्स करून घ्यावी आणि अद्रक पेस्ट, कढीपत्ता, ओवा, तीळ, तिखट, मीठ, हळद गरम तेलाचे एक चमचा मोहन आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे. आता छोटे छोटे गोळे तयार करून हातावर वडे थापून घ्यावे. आणि गरम तेलात तळून घ्यावे.

loading image
go to top