esakal | गोड आणि खुसखुशीत पदार्थ खायची इच्छा होतेय? मग ट्राय करा 'ही' रेसिपी

बोलून बातमी शोधा

recipe of double chocolate chip cookies nagpur newsrecipe of double chocolate chip cookies nagpur news}

तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून तुम्ही झटपट डबल चॉकलेट चिप कुकीज बनवू शकता. मग चला तर  पाहुयात डबल चॉकलेट कुकीजची रेसिपी...

गोड आणि खुसखुशीत पदार्थ खायची इच्छा होतेय? मग ट्राय करा 'ही' रेसिपी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : तुम्हाला गोड आणि खुसखुशीत पदार्थ खायची इच्छा होत असेल तर कुकीज पेक्षा दुसरा कुठलाही चांगला पर्याय असू शकत नाही. हे तयार करण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन खूप साहित्य खरेदी करावे लागेल असेही नाही. तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून तुम्ही झटपट डबल चॉकलेट चिप कुकीज बनवू शकता. मग चला तर  पाहुयात डबल चॉकलेट कुकीजची रेसिपी...

तयारीसाठी लागणारा वेळ - २० मिनिट
बनविण्यासाठी लागणारा वेळ - ६०

हेही वाचा - पाहुणपणाला आलेली महिला गावाला गेली, कपाट बघितले अन् कुटुंबीयांच्या पायाखालची सरकरली जमीन

साहित्य -
अर्धा कप अनसॉल्टेड बटर ते देखील रूम टेम्पेचरला विरघळलेले
अर्धा साखर
अर्धा कप ब्राऊन शुगर
रूम टेम्प्रेचरवर ठेवलेला अर्धा अंडा
एक कप मैदा
अर्धा कप अधिक २ टेबलस्पून अनस्वीटेन्ड कोको पावडर
१ टीस्पून मीठ
२ टेबलस्फून दूध
एक कप मिनी या रेग्युलर साइज सेमी-स्वीट चॉकलेट चिप्स
एक बारीक केलेली साखर

हेही वाचा - मुलींची निर्वस्त्र पूजा प्रकरण : भोंदूबाबाकडे सापडले...

कृती -
ओव्हन १८० डिग्री सेल्सियस किंवा ३५० डिग्री प्रीहीट करा. एका मोठ्या बाऊलमध्ये बटर घाला आणि त्याला व्यवस्थित फेटून घ्या. त्यामध्ये साखर आणि ब्राऊन शुगर घाला. मिश्रण फ्लपी होतपर्यंत व्यवस्थित ढवळून घ्या. यावेळी भांड्याच्या चारही बाजूला मिश्रण लागलेले असेल ते मिश्रण व्यवस्थित भांड्यामध्ये जमा करा. त्यानंतर अंडा आणि वॅनीला टाका. तसेच मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. 

दुसऱ्या एका भांड्यामध्ये मैदा, कोको पावडर, बेकींग सोडा आणि मीठ घाला. मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. मिश्रणामध्ये बटर घातलेले मिश्रण हळूहळू टाका. त्यानंतर ते व्यवस्थित फेटून घ्या. त्यानंतर दुधामध्ये चॉकलेट चिप्स टाकून ढवळून घ्या. सर्व मिश्रण ढवळून जाडसर मिश्रण तयार करा. मिश्रण प्लास्टीकने झाकून ठेवा. ३ ते ४ तास रेफ्रिजरेटरमध्ये थंड केल्यानंतर बाहेर काढून ३० ते ४५ मिनिटापर्यंत ठेवा. मिश्रण रूम टेम्प्रेचरला आल्यानंतर दोन बेकींमध्ये सीटमध्ये पार्चमेंट पेपर टाका. चमच्याच्या मदतीने मिश्रण पार्चमेंट पेपरवर ठेवा. त्यानंतर एक चमचा बॅटरला एक-एक इंच दूर ठेवा. या बेकींग सीट ओव्हनमध्ये ठेवून ८ ते १० मिनिटापर्यंत बेक करा. तुमच्या खुसखुशीत कुकीज खाण्यासाठी तयार असेल.