esakal | उडीद, मुगाच्या पीठाचा डोसा खाल्लाय, पण नाचणीच्या पीठाचा डोसा कधी ट्राय केलाय का? 'असा' तयार पौष्टीक डोसा

बोलून बातमी शोधा

recipe of finger millet dosa nagpur news}

तुम्ही कधी नाचणीच्या पीठाचा डोसा ट्राय केलाय का? केला नसेल तर नक्की करा. कारण नाचणी अत्यंत पौष्टीक पदार्थ आहे. त्यामुळे हे तुमच्या आरोग्यासाठी देखील चांगले असेल.

उडीद, मुगाच्या पीठाचा डोसा खाल्लाय, पण नाचणीच्या पीठाचा डोसा कधी ट्राय केलाय का? 'असा' तयार पौष्टीक डोसा
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : आतापर्यंत आपण डाळ, तांदळाच्या मिश्रणाच्या डोसा खाल्ला आहे. तसेच रवा डोसा, मुंगाच्या पीठाचा डोसा देखील खाल्ला आहे. मात्र, तुम्ही कधी नाचणीच्या पीठाचा डोसा ट्राय केलाय का? केला नसेल तर नक्की करा. कारण नाचणी अत्यंत पौष्टीक पदार्थ आहे. त्यामुळे हे तुमच्या आरोग्यासाठी देखील चांगले असेल.

साहित्य -
१ कप नाचणीचे पीठ
२ मोठे चमचे कापलेला कांदा
५ कोथिंबीरचे पाने
कढीपत्ता
२ कापलेली हिरवी मिरची
स्वादानुसार मीठ
आवश्यकतेनुसार पाणी

हेही वाचा - गर्दी करणे, मास्क न लावणे भोवले; १६ व्यापाऱ्यांना प्रशासनाचा दणका

कृती - 

एका भांड्यामध्ये नाचणीचे पीठ घ्या आणि त्यामध्ये थोडे-थोडे पाणी घालून मिक्स करा. एक पातळ पेस्ट तयार होतपर्यंत पाणी टाका. मात्र, त्याचा डोसा तयार व्हावा इतकी कंसिस्टेंसी बघणे गरजेच आहे. त्यामध्ये बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आणि मीठ टाका. त्याला व्यस्थित ढवळून घ्या. या मिश्रणाध्ये कुठेही गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. 
एका तवा गरम करून त्यावर डोसा पसरवा. मध्यम आंचेवर त्याला शिजू द्या. मात्र, हा डोसा तयार करताना लगेच पसरवणे गरजेचे आहे. कारण तो लवकर शिजतो. तयार झालेल्या डोस्याला दोन्ही बाजूने तूप लावा. दुसऱ्या बाजून देखील चांगला शिजवून घ्या. त्यानंतर तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा. अधिक चविष्ट बनविण्यासाठी तुम्ही तूप किंवा बटर वरून घालू शकता.