esakal | रेसिपी : खसखसीची भाजी
sakal

बोलून बातमी शोधा

recipe

रेसिपी : खसखसीची भाजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य :

 • ५० ग्रॅम खसखस

 • ३ टेबलस्पून तेल

 • १ कांदा

 • १ टमाटर

 • २ टेबलस्पून आले लसुन पेस्ट

 • ५ कढ़ीपत्ता पाने

 • १/२ टेबलस्पून जीरा

 • १/२ टेबलस्पून हळद

 • १ टेबलस्पून तिखट

 • चवीनुसार मीठ

 • १ टेबलस्पून गरम मसाला

 • १/२ टेबलस्पून गोडा मसाला

 • ३ टेबलस्पून कोथिंबिर

 • गरजेनुसार पाणी

हेही वाचा: रेसिपी : हिरव्या मिरचीचा ठेचा

कृती :

एका भांड्यात खसखस व काजू भिजवुन २० मीनिट ठेवा व नंतर मिक्सरमधुन फिरवुन पेस्ट तयार करा

एका कढ़ाई मधे ३ मोठे चमचे तेल घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जीरे, कढ़ीपत्ता घाला. बारिक चीरलेला कांदा घाला व छान लालसर होयीपर्यंत भाजुन घ्या. नंतर आले लसुण पेस्ट, हळद, तिखट, गरम मसाला, गोडा मसाला घालुन ढवळून घ्या. आता बारीक चिरलेला टमाटा आणि चवीपूरते मीठ घाला. छान तेल सूटेपर्यंत मसाला भाजुन घ्यायचा आहे.

आता खसखस आणि काजू पेस्ट टाका आणि छान ख़मंग भाजुन घ्या. तेल सुटत आले की एक कप गरम पाणी टाका आणि छान शिजले की कोथिंबीर घालुन ढवळून घ्या. गॅस बंद करुन झाकून ठेवा.

loading image
go to top