Recipe: हे पेय पिऊन कित्येक मल्ल हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी झाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

How to make thandai
Recipe: हे पेय पिऊन कित्येक मल्ल हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी झाले

Recipe: हे पेय पिऊन कित्येक मल्ल हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी झाले

स्वादिष्ट आणि पौष्टिक थंडाई कशी बनवायची? (How to make delicious and nutritious Thandai?)

सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी (Fit and Healthy Body) आपला आहार (Diet) अत्यंत महत्त्वाचा असतो. तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांचं आहाराकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे शरीराला पोषणद्रव्यांची (Nutrients) असलेली गरज पूर्ण होत नाही. त्यासाठी असं एखादा परिपुर्ण पदार्थ आपल्या आहारात असावा. जो आपल्या शरीराची पोषणद्रव्यांची कमतरता भरून काढेल, असाच एक पदार्थ म्हणजे थंडाई. थंडाईचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या शरीराची वेगाने झीज भरून काढण्यासोबतच तुमची स्मरणशक्ती (Memory), ताकद (Strength), ऊर्जा (Energy) इ.साठी थंडाई उपयुक्त आहे. बाजारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये थंडाई (Thandai) उपलब्ध मिळेल. पण यामध्ये वापरली जाणारी सामग्री आरोग्यासाठी पोषकच असेल असे नव्हे. त्यामुळे आपण घरच्या घरीच थंडाई तयार करून आस्वाद घेऊ शकता. सुकामेव्याचा समावेश करून हे पौष्टिक पेय कसे तयार करायचे, हे आपण जाणून घेऊया.

हेही वाचा: Diet Tips: आयुर्वेदात सांगितलेले हे ४ पदार्थ खा आणि तंदुरुस्त राहा

थंडाईसाठी लागणारं साहित्य(Ingredients needed for Thandai)-

· 1 चमचा बडीशेप

· 5/6 बदाम

· 3/4 हिरवी वेलची

· 1 चमचा खसखस

· 1 कप साखर

· 8 - ब्लॅक पेपर

· 5/6 पिस्ता

· 5/6 काजू

· 2 कप थंड दूध

· 1 कप पाणी

· आवश्यकतेनुसार केशर

2/3 चमचे सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या (आवश्यकतेनुसार)

हेही वाचा: Winter Diet: हिवाळ्यात रिकाम्या पोटी हे ६ पदार्थ खा आणि तंदुरुस्त राहा

थंडाई कशी करायची याची कृती (How to make Thandai?)

एका बाउलमध्ये बदाम, काजू, पिस्ता, बडिशेप, गुलाबाच्या पाकळ्या, खरबुजाच्या बिया, काळी मिरी, हिरवी वेलची, खसखस एकत्रित घ्या आणि एक ग्लास पाण्यामध्ये सर्व भिजत ठेवा. हवं असल्यास आपण यामध्ये केशर देखील मिक्स करू शकता. तीन ते चार तास सर्व सामग्री भिजत ठेवा.

सर्व सामग्री व्यवस्थित भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या आणि पातळ पेस्ट तयार करा. आता कापडाच्या मदतीने पेस्ट गाळून घ्या. एका स्वच्छ व पातळ कापडाच्या मदतीने हे मिश्रण गाळून घ्यावे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये साखर घ्या आणि त्यामध्ये दोन ग्लास थंड दूध ओतावे. यानंतर थंडाईचे मिश्रणही दुधामध्ये मिक्स करा.

तुमची पौष्टीक थंडाई तयार आहे. अशी थंडाई तुम्ही जर रोज प्यायलात तर तुमचं शरीराची पोषणतत्वांची गरज बऱ्यापैकी भागेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top