Recipe: मराठवाडा स्पेशल लसणाचा तिखट झणझणीत खुडा कसा करतात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada special spicy garlic paste

Recipe: मराठवाडा स्पेशल लसणाचा तिखट झणझणीत खुडा कसा करतात?

Marathwada special recipe: तिखट- लसूणाचा खुडा हा पदार्थ गावाकडे शेतकरी मायबाप मोठ्या प्रमाणात खातात कारण भाजीला उत्तम पर्याय खुडा देतो. खुडात तीळ लसूण घातल्यामुळे तो चवदार होतो. सोबतच हिवाळ्यात लसूण खाण्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते तर चांगले कोलेस्टेरॉल  वाढते.

लसूण खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच लसूण खाल्याने टाईप 2 प्रकारचा मधुमेह होण्याचा धोकासुध्दा कमी होतो.आजच्या लेखात आपण मराठवाडा स्पेशल पारंपरिक पद्धतीने लाल तिखट आणि लसणाचा खुडा कशा तयार करायचा याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत या रेसिपीला कदाचित वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावं असू शकतात. पण मराठवाड्यात हा पदार्थ तिखट- लसूणाचा खुडा याच नावाने ओळखला जातो. 

साहित्य:

● अर्धा वाटी लाल तिखट

● अर्धा वाटी तीळ

● तेल

● लसूणाच्या पाकळ्या

● जीरे

● चवीनुसार मीठ

● कोथिंबीर

हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात ओव्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?

कृती:

सगळ्यात आधी तर लसूण सोलून घ्यावा आणि त्याचे बारीक- बारीक काप करून घ्यावे.नंतर फोडणी करण्याची जी लहान कढई असते ती गॅसवर ठेवा. त्यात तेल टाकावे. तेल तापल्यानंतर जीरे टाकून फोडणी करून घ्यावी.ही सगळी रेसिपी करताना गॅस मंद आचेवर ठेवावा. फोडणी झाल्यानंतर तेलामध्ये तीळ आणि लसूण घालावे. तीळ चांगले लालसर परतून घ्यावे. ते जळणार नाहीत, याची मात्र काळजी घ्या.त्यानंतर तिखट घाला आणि चवीनुसार मीठ घाला. गॅस एकदम कमी ठेवा. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या. तिखट चांगलं परतून झालं की गॅस बंद करा. त्यात बारीक चिरलेला कोथिंबीर घालावा अशा रितीने आपला खमंग- झणझणीत खुडा तयार आहे.तुम्ही हा खुडा भाकरी पोळी सोबत खाऊ शकता.