असं बनवा लज्जतदार भरलेलं Chili Pickle, तोंडाला सुटेल पाणी

मिरचीच्या लोणच्यामुळे जेवणाची मजा तर वाढेलच शिवाय हे लोणचं तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल. चयापचय क्रिया जलद होण्यासाठी तसंच आतड्यांच्या समस्या दूर होण्यासाठी भरलेल्या मिरचीचं लोणचं फायदेशीर ठरू शकतं
chili pickle recipe
chili pickle recipeEsakal

chili pickle recipe: हिरवी मिरची Green Chili हा असा पदार्थ आहे तो भारतीय स्वयंपाकासाठी Cooking हमखास वापरला जातो. जेवणात तिखटपणा आणण्यासोबतच मिरचीमुळे पदार्थाला एक खास चव येते. Recipe Marathi Try This Stuffed Chili Pickle to increase taste of meal

मिरचीचा Chili स्वयंपाकासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. भाजी किंवा आमटीमध्ये Curry मिरची तिखटपणासाठी वापरली जाते. तर कधी मिरचीचा ठेचा जेवणाची रंगत वाढवतो. अशाच या मिरचीचं झटपट तयार होणारं लोणचं देखील तुमच्या जेवणाची चव वाढवेल.

मिरचीच्या लोणच्यामुळे जेवणाची मजा तर वाढेलच शिवाय हे लोणचं तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल. चयापचय क्रिया जलद होण्यासाठी तसंच आतड्यांच्या समस्या दूर होण्यासाठी भरलेल्या मिरचीचं लोणचं फायदेशीर ठरू शकतं.

तेव्हा आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भरलेल्या मिरचीच इन्स्टंट लोणचं.....

हे देखिल वाचा-

chili pickle recipe
हिरवी मिरची जास्त दिवस टिकत नाही, मग या पद्धतीने करा Green Chille स्टोअर अनेक दिवस राहिल एकदम ताजी

भरलेल्या मिरचीच लोणच्यासाठी लागणारं साहित्य

हिरव्या मिरच्या २०० ग्रॅम, २ टीस्पून लाल मिरची पावडर. १ चमचा हळद, २ चमचे धणे पावडर, १ चमचा जीरं पावडर, १ टीस्पून बारीक केलेली बडीशेप, अर्धा चमचा गरम मसाला, १ चमचा आमचूर पावडर, पाव वाटी बेसण, १ चमचा मीठ, तेल

भरलेल्या मिरचीचं लोणचं बनवण्याची कृती(Chili Pickle Recipe)

  • तुमच्या आवडीच्या हिरव्या मिरच्या तुम्ही वापरू शकता. मिरच्या स्वच्छ धुवून त्या कोरड्या करून घ्या.

  • त्यानंतर मिरच्यांना मधून उभे काप द्या.

  • मसाला तयार करण्यासाठी एका वाडग्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धणे पूड. जीरं पूड तसचं बडीशेप पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर आणि मीठ हे सर्व कोरडे मसाले एकत्र करा.

  • एका पॅनमध्ये २ चमचे तेल तापवत ठेवा. तेल तापल्यानंतर त्यात बेसन टाकून मंच आचेवर ३-४ मिनिटांसाठी बेसन रोस्ट करा. त्यानंतर यात सर्व मसाल्यांचं मिश्रण टाकून १ मिनिटांसाठी परतून गॅस बंद करा.

  • आता मिरचीमध्ये भरण्यासाठी तयार असलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून गार होवू द्या.

  • मसाला गार झाल्यानंतर उभ्या चिरा दिलेल्या मिरच्यांमध्ये नीट भरून घ्या.

  • एका कढईमध्ये ४-५ चमचे तेल तापवत ठेवा.

  • तेल तापल्यानंतर सर्व भरलेल्या मिरच्या तेलात सर्व बाजूंनी चांगल्या ४-५ मिनिटांसाठी परतून घ्या.

  • मिरच्या गार झाल्यानंतर तुम्ही एखाद्या बरणीत भरून ठेवू शकता.

  • अशा प्रकारे लज्जतदार झणझणीत आणि चटकदार असं भरलेल्या मिरचीचं लोणचं तयार होईल. पराठे किंवा चपातीसोबत या मिरचीच्या लोणच्याची मजा तुम्ही लूटू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com