उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे का असते आरोग्यदायी ? घरीच बनवण्याची पद्धत

कैरीचे पन्हे पिण्याचे नक्की फायदे काय आहेत हे आपण पाहूया..
उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे का असते आरोग्यदायी ? घरीच बनवण्याची पद्धत

अकोला : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की वेध लागतात ते कैरीच्या पन्ह्याचे. कैरीचे पन्हे हे उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याचे अनेक फायदे आहेत. हे हंगामी फळ असलं तरीही याचे फायदेही अनेक आहेत. कैरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स यांचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. याचा खरं तर वेगवेगळ्या प्रकारात आपण वापर करत असतो. कैरीचं लोणचं, मँगो मिल्क शेक, आमरस असे अनेक पदार्थ आपण करतो. पण यापैकी जास्त फायदा होतो तो कैरीच्या पन्ह्याने. हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. याचा आंबट गौड स्वाद आपल्याला याचे सेवन करण्यास आणि चव घेण्यास नक्की भाग पाडतो. पण तुम्हाला याचे आरोग्याला होणारे फायदे माहीत आहेत का? आम्ही या लेखातून तुम्हाला याचे महत्त्वाचे फायदे सांगणार आहोत. कैरीचे पन्हे पिण्याचे नक्की फायदे काय आहेत हे आपण पाहूया.

कैरीचं पन्ह्याचा स्वाद आंबट गोड असतो. लहान मुलांना कैरी तसेच कैरीच्या पन्ह्याची चव जास्तचं आवडते. आजही ग्रामीण भागात कैरीचे पन्हे बनवले जाते. उन्हाळ्यात हमकास बनवली जाणारी ही रेसिपी अतिशय गुणकारी ठरते. आज या लेखातून आपण कैरीच्या पन्ह्याचे आरोग्यदायी फायदे आणि पन्हे बनवण्याची पद्धत जाणून घेणार आहोत.

उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे का असते आरोग्यदायी ? घरीच बनवण्याची पद्धत
कौतुकास्पद! 11 दिवसांच्या चिमुकलीची आई कोरोनाबाधित; मैत्रिणीने दिली मायेची ऊब

बद्धकोष्ठापासून देते संरक्षण

कैरीच्या पन्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्याचे सेवन केल्यामुळे तुमचे पचनस्वास्थ्य चांगले राहाते आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याचे पन्हे प्यायल्याने पोट साफ राहते आणि पोटाचा कोटा साफ राहिल्याने पोटाला त्रास होत नाही.

मधुमेही रूग्णांसाठी ठरते फायदेशीर

कैरीच्या पन्ह्यामध्ये नैसर्गिक साखर असते. यामध्ये लॉ ग्लाईसेमिक इंडेक्स असते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. उन्हाळ्याच्या दिवसात याचे सेवन करण्याने इन्शुलिनची पातळी कमी होत नाही. त्यामुळे मधुमेह न वाढता आरोग्याची काळजी घेण्याचं काम कैरीचे पन्हे करते.

नैसर्गिक रक्तप्रवाह सुधारतो

फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या या आंब्यामध्ये विटामिन सी चे प्रमाण असते. जे आपल्या रक्तप्रवाहासाठी उत्तम ठरते. शरीरातील रक्तसंचार सुधारण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. कैरीचे पन्हे आपले ब्लड सर्क्युलेशन नीट वाढवते आणि नव्या प्रवाहासाठीदेखील याचा फायदा मिळतो.

कॅन्सरपासून करते बचाव

कैरीमध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात असते ज्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे कॅन्सरच्या विषाणूंना मारण्याचे काम कैरी करत असते. त्यामुळे आतड्याचा कॅन्सर आणि पोटाचा कॅन्सर न होण्यासाठी आपण कैरीचे पन्हे नेहमी प्यायला हवे. याची अतिशयोक्ती नक्कीच नको मात्र तुम्हाला त्यापासून फायदाही नक्कीच मिळतो.

त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत

यामधील विटामिन सी आणि ए ही पोषक तत्वे आपल्या त्वचेला अधिक चमकदार करण्यासाठी मदत करतात. तसेच तुम्हाला जर चेहऱ्यावर सुरकुत्या नको असतील तर तम्ही कैरीचे पन्हे हे नक्कीच प्यायला हवे. कारण तुमची त्वचा अधिक सुंदर आणि डागविरहीत करण्यासाठी यातील पोषक तत्वे फायदेशीर ठरतात.

डोळ्यांसाठीही फायदेशीर

कैरीच्या पन्ह्यामध्ये विटामिन ए आढळते. हे आपल्या डोळयांसाठी फायदेशीर ठरते. कैरीचे पन्हे प्यायल्याने डोळे निरोगी राहतात आणि दृष्टीदेखील चांगली राहते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी नीट ठेवायची असेल तर तुम्ही कैरीचे पन्हे नक्की प्या.

उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे का असते आरोग्यदायी ? घरीच बनवण्याची पद्धत
रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच नवरा बायकोने ठोकली धूम; आरोग्य यंत्रणेची तारांबळ

दातांच्या हिरड्या राहतात निरोगी

कैरीच्या पन्ह्यामध्ये असलेले विटामिन सी हे पोषण देतेच मात्र यामध्ये असलेले पोटॅशियम आणि कॅल्शियम हे दात आणि हिरड्यांच्या निरोगीपणासाठी अधिक फायदेशीर ठरते. तुम्हाला तुमचे दात निरोगी ठेवायचे असतील तर तुम्ही कैरीच्या पन्ह्याचा उपयोग करून घेऊ शकता.

डिहायड्रेट होऊ देत नाही

उन्हाळ्याच्या दिवस शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता जास्त असते. शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाणेही आवश्यक आहे. पण कैरीच्या पन्ह्यामुळे तुम्ही डिहायड्रेशनपासून वाचता. तसेच हे शरीराला योग्य थंडावा मिळवून देते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात याचे सेवन करणे योग्य ठरते.

प्रतिकारशक्ती वाढवते

विटामिन सी, विटामिन बी6, विटामिन ए असे सर्व अँटीऑक्सिडंट्स असणारे घटक आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात आणि हे सर्व घटक आपल्याला कैरीच्या पन्ह्यामध्ये आढळतात. तसेच याचे सेवन आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासही मदत करतात.

कैरीचे पन्हे कसे तयार कराल ?

कैरीचे पन्हे बनवण्यासाठी लागणारे साहित्य -

  • 2-3 कैऱ्या

  • 2 चमचे काळे मीठ

  • 2 चमचे जिरे पावडर

  • अर्धा चमचा काळी मिरी पावडर

  • 15-20 पुदीना पाने

  • 100 - 150 ग्रॅम साखर

उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे का असते आरोग्यदायी ? घरीच बनवण्याची पद्धत
'ऑक्‍सिजनवर बोलू काही..!'

कैरीचे पन्हे बनविण्याची पद्धत

सर्वात अगोदर कैरी उकडून घ्या. त्यानंतर त्याची कोय काढून टाका. उकडलेल्या कैरीचा रस काढून घ्या. त्यात साखर, काळे मीठ, पुदीना घालून मिक्सरमधून वाटा. हे सर्व मिश्रण गाळून घ्या. यात काळी मिरी पावडर आणि जिरा पावडर घाला आणि त्यात थोड पाणी मिक्स करा. अशा पद्धतीने तुम्ही कैरीचे पन्हे बनवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com