esakal | विदर्भाची खासियत म्हणजे चमचमीत डाळ कांदा, वाचा रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

dal kanda

विदर्भाची खासियत म्हणजे चमचमीत डाळ कांदा, वाचा रेसिपी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भाची खाद्यसंस्कृती (vidarbha food culture) अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील सावजी, पाटोडी, डाळकांदा असे एक ना अनेक पदार्थ खवय्यांना भूरळ घालतात. आज आम्ही तुम्हाला विदर्भाची खासियत असलेला चमचमीत डाळ कांद्याची रेसिपी (vidarbha special dal kanda recipe) सांगणार आहोत.

हेही वाचा: श्रावण विशेष : मूग डाळीचा पराठा

बनविण्यासाठी लागणारा वेळ - १तास

साहित्य (५ व्यक्तींसाठी)

  • १ वाटी भिजवलेली चणाडाळ

  • ३ टेबलस्पून तिखट

  • १ टेबलस्पून गरम मसाला

  • २ टेबलस्पून आलं-लसणाची पेस्ट

  • ६ बारीक चिरलेले कांदे

  • १ टेबलस्पून जिरे मोहरी

  • २ लवंगा

  • २ मोठ्या विलायची

  • २ दालचिनीचे तुकडे

  • चवीनुसार मीठ

कृती -

एका कढईत तेल घ्यावे. तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे, मोठी विलायची, लवंग, दालचिनी, तमालपत्र टाकून चिरलेला कांदा टाकावा. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावा. कांदा परतताना त्यामध्ये मीठ टाकावे नंतर त्यात आले लसणाची पेस्ट टाकून पाच मिनिटं शिजवून घ्यावे. नंतर तिखट,गरम मसाला, मीठ, हळद टाकून परतून घ्यावे.

चनादाळ टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. दोन ग्लास पाणी टाकून चणा डाळ चांगली शिजवून घ्यावी. तयार आहे आपला चमचमीत विदर्भ स्टाइल डाळ कांदा. गरम गरम चपाती भातासोबत सर्व्ह करावा.

loading image
go to top